शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जनहितच्या आंदोलनाला यश; संत दामाजी व फॕबटेक कारखान्यांवर होणार आरआरसी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 21:42 IST

साखर सहसंचालकांनी कारवाईचे दिले लेखी आश्वासन; जनहितचे आंदोलन तूर्त स्थगित

मंगळवेढा : साखर सहसंचालकांनी संत दामाजी व फॅबटेक कारखान्यावर आरआरसी कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने जनहित शेतकरी संघटनेचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर असलेले बेमुदत धरणे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. यावेळी सहाय्यक निबंधक पी.सी दुरगूडे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.

यावेळी प्रभाकर देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, साखर सहसंचालकांनी मागील चार महिन्यांमध्ये संबंधित कारखान्यावर कारवाई का केली नाही. यामध्ये साखर सहसंचालक यांचीही भूमिका संशयास्पद वाटते, याबाबतीत या बेजबाबदार साखर सहसंचालकांची ही चौकशी व्हावी अशी मागणी लावून धरली आहे.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, भैरवनाथ शुगर व युटोपियन शुगर या कारखानदारांनी सुरुवातीला दोन महिने शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस द्यावा यासाठी वाढीव रकमेसह पैसे दिले व डिसेंबर नंतरच्या  ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना मात्र  जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी पैसे दिले आहेत हा दुजाभाव शेतकऱ्यांचा बाबतीत का केला?  याबाबतीत येत्या दहा-बारा दिवसांमध्ये जर जाहीर केल्याप्रमाणे वाढीव रक्कम उत्पादकांच्या खात्यावरती जमा केली नाही तर जनहित शेतकरी संघटना पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचे ही सांगितले.

यावेळी उपस्थित रघु चव्हाण, बिरुदेव ढेकळे, बलभीम माळी, पप्पू दत्तू, सुखदेव डोरले, शिवाजी कांबळे, बाळासाहेब नागणे, सर्जेराव गाडे, संजय हणमणे, सुनिल पुजारी , शामराव पुजारी ,सर्वेश्वर शेजाळ, ज्ञानेश्वर पवार, शिवाजी जाधव, हरी चव्हाण, गणपत ढेळे, राहुल पवार, मारुती भोरकडे, सिताराम पाटील, आप्पा भुई तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी