शिष्यवृत्ती परीक्षेत कुरुल हायस्कूलचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:23 IST2021-08-29T04:23:17+5:302021-08-29T04:23:17+5:30

कुरुल : राष्ट्रीय दुर्बल आर्थिक घटक शिष्यवृत्ती परीक्षेत कुरुल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश ...

Success of Kurul High School in Scholarship Examination | शिष्यवृत्ती परीक्षेत कुरुल हायस्कूलचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेत कुरुल हायस्कूलचे यश

कुरुल : राष्ट्रीय दुर्बल आर्थिक घटक शिष्यवृत्ती परीक्षेत कुरुल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रुपये बारा हजारप्रमाणे चार वर्षांत एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यामध्ये ३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. वैष्णवी संभाजी धर्मशाळे, कर्तव्या राजकुमार बाळसराफ, विक्रांत राजेंद्र शिंदे या विद्यार्थ्यांनी यात यश मिळवले आहे.

या विद्यार्थ्यांना या विभागाचे प्रमुख व्ही. ए . गायकवाड,एस.एम. माने,ए .ए. बिराजदार, जी. एस. आतकरे, एस. एस. अक्कलकोटे, पी. ए. सुर्वे यांनी मार्गदर्शन केले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन प्राचार्य राजेंद्र रेपाळ, पर्यवेक्षक डी. टी. मोहिते, रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील, विभागीय अधिकारी कमलाकर महामुनी, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य विलास पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष शत्रुघ्न जाधव, लिसुराम उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष लिंगेश्वर निकम, शिवसेना तालुका उपाध्यक्ष विनोद आंबरे, दत्तात्रेय बोंगे, महेश माने, संजीव अक्कलकोटे, राजीव अक्कलकोटे, नीलकंट खरात, बिराजदार के.एस., विनोद खाडे यांनी कौतुक केले आहे.

-----

फोटो : १९ वैष्णवी धर्मशाळे,

१९ कर्तव्या बाळसराफ

Web Title: Success of Kurul High School in Scholarship Examination