विकासात्मक प्रस्ताव दाखल करा; १५ दिवसांत निधी देऊ : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:42+5:302020-12-30T04:29:42+5:30

सोमवारी जलसंपदा भवन, पुणे येथे जगताप यांनी जयंत पाटील यांची भेट घेऊन करमाळ्याच्या विविध विकासकामांचे प्रस्ताव व निधीची ...

Submit developmental proposals; We will provide funds in 15 days: Patil | विकासात्मक प्रस्ताव दाखल करा; १५ दिवसांत निधी देऊ : पाटील

विकासात्मक प्रस्ताव दाखल करा; १५ दिवसांत निधी देऊ : पाटील

सोमवारी जलसंपदा भवन, पुणे येथे जगताप यांनी जयंत पाटील यांची भेट घेऊन करमाळ्याच्या विविध विकासकामांचे प्रस्ताव व निधीची उपलब्धता याबाबत चर्चा केली.

या वेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पूजा झोळे, युवा उद्योजक चेतककुमार गुगळे उपस्थित होते. जगताप यांनी केलेल्या मागण्यांवर विचार करून त्वरित प्रस्ताव दाखल करा, निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

----

जुन्या आठवणींना उजाळा

लोकनेते राजारामबापू पाटील व देशभक्त नामदेवराव जगताप यांच्यातील असलेल्या स्नेहाच्या संबंधाचा आवर्जून उल्लेख केला. मी व जयवंतराव जगताप आमच्या दोघांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ एकाच वेळी अपक्ष आमदार म्हणून झाला. माजी आ. जगताप व आपल्यातील मैत्रीपूर्ण, सौहार्दाच्या संबंधांची माहिती देत करमाळ्याच्या विकासात्मक कामांना निश्चितपणे मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे जगताप यांनी सांगितले.

----

फोटो ओळी : करमाळा नगर परिषदेच्या विकासकामासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे निधीची मागणी करताना नगराध्यक्ष वैभव जगताप, पूजा झोळे.

----

Web Title: Submit developmental proposals; We will provide funds in 15 days: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.