वालवड ग्रामपंचायतवर पुन्हा सुभाष जाधवर यांच्या गटाची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:08+5:302021-01-21T04:21:08+5:30

बार्शी : वालवड ग्रामपंचायत निवडणूक निकालात ॲड. सुभाष जाधवर पॅनलने ७ पैकी ५ जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा ...

Subhash Jadhav's group regains control of Valwad Gram Panchayat | वालवड ग्रामपंचायतवर पुन्हा सुभाष जाधवर यांच्या गटाची सत्ता

वालवड ग्रामपंचायतवर पुन्हा सुभाष जाधवर यांच्या गटाची सत्ता

बार्शी : वालवड ग्रामपंचायत निवडणूक निकालात ॲड. सुभाष जाधवर पॅनलने ७ पैकी ५ जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित केली आहे.

उत्तर बार्शी तालुक्याच्या टोकाला, बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वालवड ग्रामपंचायतीत एकूण ७ सदस्य आहेत. गावची एकूण मतदार संख्या ७५० आहे. ३७९ पुरुष मतदार तर ३७१ महिला मतदार आहेत. या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुभाष जाधवर पॅनल, सुधीर जाधवर पॅनल व वंचित आघाडी अशी तिरंगी लढत झाली. यामध्ये सुभाष जाधवर गटाने ७ पैकी ५ जागा जिंकून वर्चस्व मिळवत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली.

वालवड ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच एंट्री केलेले प्रा. गुणवंत जाधवर विजयी झाले. या निवडणुकीत ॲड. सुभाष जाधवर, प्रा गुणवंत जाधवर, सुनंदा जाधवर, शिवरंजना जाधवर, वर्षा भालेराव, सुधीर जाधवर व शकुंतला जाधवर हे उमेदवार विजयी झाले.

--

फोटो : २० वालवड

वालवड ग्रामपंचायत निकाल लागताच ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला.

Web Title: Subhash Jadhav's group regains control of Valwad Gram Panchayat