शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, दीपक साळुंखे-पाटील, समाधान आवताडेंसह १९४ जणांनी नेले २७७ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:40 IST

सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी १९४ जणांनी २७७ उमेदवारी अर्ज नेले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक ...

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकृतीचे काम सुरू सर्व तहसील कार्यालयात अर्ज देणे व घेण्याची सोय करण्यात आली आहेसोलापूर दक्षिणसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, बार्शीत राजेंद्र राऊत, सांगोल्यात दीपक साळुंखे पाटील आणि पंढरपुरात समाधान आवताडे, शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज नेले

सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी १९४ जणांनी २७७ उमेदवारी अर्ज नेले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र   भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.  सोलापूर दक्षिणसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, बार्शीत राजेंद्र राऊत, सांगोल्यात दीपक साळुंखे पाटील आणि पंढरपुरात समाधान आवताडे, शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज नेले.

विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकृतीचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व तहसील कार्यालयात अर्ज देणे व घेण्याची सोय करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी १९४ जणांनी अर्ज नेले आहेत. अक्कलकोट विधानसभेसाठी गंगाराम कटकधोंड उर्फ व्यंकटेश स्वामी यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर पंढरपूर येथे सुदर्शन खंदारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

विधानसभानिहाय नेण्यात आलेले अर्ज पुढीलप्रमाणे आहेत. कंसात अर्ज नेणाºया व्यक्तींची संख्या आहे. करमाळा: १६ (१३), माढा: ९ (७), बार्शी: ३0 (३0), मोहोळ: १४, सोलापूर शहर उत्तर: १९ (१७), सोलापूर शहर मध्य: ३५ (२७), अक्कलकोट: २२ (१५), दक्षिण सोलापूर : ३७ ,(३७), पंढरपूर: ३६ (२0), सांगोला: ४0 (१९), माळशिरस: १९ (९).शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सपाटे, महेश निकंबे, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांनी अर्ज नेले आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रतिनिधीमार्फत अर्ज नेला आहे. 

शहर मध्यमध्ये माजी आमदार आडम मास्तर, स्वाभिमानी रिपाइंचे दीपक गवळी, हिंदुस्तान जनता पार्टीचे गौस कुरेशी, भाजपचे नगरसेवक  नागेश वल्याळ, एमआयएमचे इरफान शेख, बसपाचे राहुल सर्वगोड, शिवसंग्रामचे मनीष गायकवाड व पीपीआयचे आनंद जगदने यांनी अर्ज नेले आहेत. 

चोख पोलीस बंदोबस्त- विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज देण्या-घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केल्याने सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळात निवडणूक कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून शंभर मीटरच्या अंतरावर सर्व प्रकारची वाहने रोखून धरण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शहर उत्तर व दक्षिण सोलापूर अशी दोन निवडणूक कार्यालये असल्याने प्रवेशद्वारावरच वाहने अडविण्यात आली. यामुळे वाहतूक जामची समस्या निर्माण झाली. निवडणूक कार्यालयाबाहेर गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कार्यालयात अर्ज घेणे व देण्यासाठी आलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण