शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष देशमुखांनी विचारले, ‘कशावर बोलू ?’  समोरुन आवाज घुमला, ‘कर्जमाफीवर बोला !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 10:52 IST

सोलापूर : राजकारणाचा तिरस्कार करणारा मी सिद्धरामेश्वरांची भक्ती केली म्हणून या पदापर्यंत पोहोचलो. मी कशावर बोलू सांगा...खालून आवाज आला ...

ठळक मुद्देअटल महापणन पुरस्कार वितरण सोहळा सहकारमंत्री म्हणाले सरसकट कर्जमाफी अशक्य२००७-०८ च्या सरसकट कर्जमाफीत १५८ कोटींची वसुली - सहकारमंत्री

सोलापूर : राजकारणाचा तिरस्कार करणारा मी सिद्धरामेश्वरांची भक्ती केली म्हणून या पदापर्यंत पोहोचलो. मी कशावर बोलू सांगा...खालून आवाज आला कर्जमाफीवर बोला. कर्जमाफीवर बोलत असताना उपस्थितांनी सरसकट कर्जमाफी..  असा एकच आवाज घुमताच हे अशक्य असल्याचे ठासून सांगितले आहे राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी.

सोमवारी सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिरात अटल महापणन विकास अभियानांतर्गत ५००० विकास संस्थांच्या सक्षमीकरणाचा शुभारंभ व अटल महापणन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राज्यस्तरीय कार्यक्रमात राज्यभरातील १४१ संस्थांना गौरविण्यात आले. यावेळी सहकारमंत्री देशमुख बोलत होते. 

कर्जमाफीसाठी बँकांकडून मागविलेल्या माहितीमध्ये राज्यातील ८९ हजार शेतकºयांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करावी लागत होती.  २००७-०८ च्या कर्जमाफीत झालेला घोळ लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी  शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ७७ लाख शेतकºयांनी अर्ज केले व ४९ लाख शेतकºयांची १७ हजार कोटींची कर्जमाफी झाल्याचे सहकार मंत्र्यांनी सांगितले. 

उर्वरित २२ लाख शेतकºयांच्या अर्जांची छाननी सुरू आहे. आता विकास सोसायट्यांनी कर्ज वाटपाचेच धोरण बदलले पाहिजे जेणेकरुन पुन्हा-पुन्हा कर्जमाफीची वेळ येणार नाही असे ते म्हणाले. नको ते पायंडे जिल्हा बँका व विकास सोसायट्यांनी पाडले, शेतकºयांना सज्ञान केले नाही असेही ते म्हणाले. उपस्थितांमधून सरसकट कर्जमाफीचा आवाज आल्यानंतर त्यांनी अन्य राज्यांनी केलेली कर्जमाफी पाहता आपल्या राज्यात सरसकट कर्जमाफी करणे अशक्य असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाला पणनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश म्हसे, अपर व्यवस्थापकीय संचालक शिवाजी पहिनकर, कार्यकारी संचालक सुनील पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे,  विभागीय सहनिबंधक  मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, राजाराम दिघे, गणेश शिंदे, जिल्हा बँकेचे प्रशासक  शैलेश कोतमिरे आदी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील विकास सोसायटीमधून होनमुर्गी विकास सोसायटी प्रथम, शुगरकेन प्रोड्युसर विकास संस्था माळीनगर द्वितीय  व औराद विकास संस्थेला तिसरा क्रमांक मिळाला. खरेदी- विक्री संघाच्या पुरस्कारासाठी  पुणे विभागातून सांगोला खरेदी-विक्री संघाला दुसरा तर दक्षिणचे सहायक निबंधक बालाजी वाघमारे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. 

सहकारमंत्र्यांच्या भाषणातून..

  • - हमीभाव कायदा असताना धान्याची कमी दराने खरेदी करणाºयांवर कारवाई नाही. 
  • - २००७-०८ च्या सरसकट कर्जमाफीत १५८ कोटींची वसुली निघाली. 
  • - गावातला पैसा गावातच फिरला पाहिजे यासाठी विकास सोसायट्यांनी रोजगार निर्माण करावा.
  • - सहकारातून उद्योग धंदे निर्माण करा
टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी