शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात सुभाष देशमुख एकटेच ‘चौकीदार’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:45 IST

महेश कुलकर्णी  सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सोशल मीडियावर ‘मंै भी चौकीदार’ हे नवे अभियान राबविण्यात आले आहे. ...

ठळक मुद्देभाजपाच्या अभियानात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचा सहभाग नाहीलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सोशल मीडियावर ‘मंै भी चौकीदार’ हे नवे अभियानसुभाष देशमुख यांनीच टिष्ट्वटरवर ‘चौकीदार सुभाष देशमुख’ असे नाव बदलले

महेश कुलकर्णी 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सोशल मीडियावर ‘मंै भी चौकीदार’ हे नवे अभियान राबविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टिष्ट्वटर हँडलवरील नावात बदल करून ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असं केलं आहे. त्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांचं अनुकरण केलं आहे. महाराष्टÑाच्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनीही हँडलवरील नाव बदलले आहे. सोलापुरात भाजपाचे दोन मंत्री आणि एक खासदार  आहेत. यापैकी केवळ सुभाष देशमुख यांनीच टिष्ट्वटरवर ‘चौकीदार सुभाष देशमुख’ असे नाव बदलले आहे.

पश्चिम महाराष्टÑातून भाजपाला पहिला खासदार देणारे शहर म्हणून सोलापूरला ओळखले जाते. सध्या सोलापुरात सर्वच प्रमुख ठिकाणी भाजपा सत्तेत आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता आहे.

 जिल्हा परिषदेत भाजपा आघाडीची सत्ता आहे. याचबरोबर सोलापूरचा खासदार आणि दोन मंत्री अशा प्रमुख सत्ताकेंद्रावर भाजपाची पकड आहे. 

काँग्रेसने सोशल मीडियात ‘चौकीदार चोर है’ असं कॅम्पेन उघडलं होतं, याच कॅम्पेनला प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून ‘मैं भी चौकीदार’ या कॅम्पेनची सोशल मीडियात सुरुवात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टिष्ट्वटर अकाऊंटचे ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. त्याचपाठोपाठ भाजपाच्या केंद्र आणि महाराष्टÑ सरकारातील अनेक मंत्र्यांनी,  मोठ्या नेत्यांनीदेखील टिष्ट्वटरवरील नाव बदलले आहे. 

मोदी यांच्यानंतर भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ‘चौकीदार’ अभियानात सहभागी होण्याच्या  सूचना पक्षाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या सूचनेनंतर सोलापुरात केवळ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीच टिष्ट्वटर हँडलवरील नावात बदल केला आहे. खासदार शरद बनसोडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह सोलापुरातून भाजपाकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले अमर साबळे यांनीही टिष्ट्वटरवरील  नावात बदल केला नाही. 

काय आहे ‘चौकीदार’ अभियान ?- राहुल गांधी यांच्या ‘चौकीदार चोर है’ या घोषणेला उत्तर देण्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वट केलं, त्यामध्ये मोदी म्हणाले की, मी देशाची सेवा करण्यासाठी चौकीदार आहे. पण मी एकटा चौकीदार नाही तर भ्रष्टाचाराविरोधात लढणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. जो देशाची प्रगती करण्यासाठी मेहनत करतोय, तो चौकीदार आहे. आज देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार आहे असं म्हणत मैं भी चौकीदार ही मोहीम टिष्ट्वटरवर सुरु केली आहे. 

या प्रमुखांचा अभियानात नाही सहभाग

  • - पालकमंत्री विजयकुमार देशमुख
  • - खासदार शरद बनसोडे
  • - खासदार अमर साबळे
  • - अविनाश महागावकर
  • - महापौर शोभा बनशेट्टी
  • - जिल्हाध्यक्ष शहाजी पवार
  • - शहराध्यक्ष अशोक निंबर्गी
टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखTwitterट्विटरNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक