शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नान्नज येथील अनाथ मुले गणेशमुर्ती तयार करण्यात दंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 12:35 IST

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुलांची कला : गणेशमूर्ती बनविण्याचे काम वेगात

ठळक मुद्देकारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुलांची कलागणेशमूर्ती बनविण्याचे काम वेगातआकर्षक व रेखीव मूर्तींना चांगलीच मागणी

पिंटू विभूते नान्नज : आईच्या खुनानंतर वडील कारागृहात... मग अनाथ झालेल्या मुलांनी करायचे काय? अंगातील कलेनेच या मुलांना तारले. सध्या येरवडा कारागृहात असलेल्या नवनाथ लोहार यांची अभिजित आणि गजानन ही मुले आजी-आजोबांसमवेत गणेशमूर्ती आणि लक्ष्मी मुखवटे बनविण्यात दंग आहेत. 

गोरख लोहार हे ४५ वर्षांपासून लक्ष्मी मुखवटे आणि गणेशमूर्ती तयार करतात. त्यांचा मुलगा नवनाथ हाही या कलेत पारंगत होता. मात्र पत्नीच्या खुनानंतर तो येरवडा कारागृहात गेला. अभिजित हा सातवीत असून, तो सोलापुरातील शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतोय. गजानन हा गावातच चौथीत शिकत आहे.  सध्या आजोबा गोरख आणि आजी विमल यांच्या हाताखाली दोन्ही मुले मूर्ती कलेत पारंगत झाली असून, या व्यवसायाला गती देण्याचे काम दोन मुले करीत आहेत. काही दिवसांपासून आलेल्या गणेशोत्सवाची तयारी ठिकठिकाणी सुरू आहे़ यासाठी मूर्तीकारांसोबत सर्वच यंत्रणा सज्ज झाल्या असल्याचे पहावयास मिळत आहे़

आकर्षक व रेखीव मूर्तींना चांगलीच मागणी- पूर्वी लोहार कुटुंबीय मातीच्या मूर्ती बनवत असत. जसा काळ बदलला तसा प्लॅस्टर मूर्तीचा जमाना आला. ही कलाही या कुटुंबातील सदस्यांनी आत्मसात केली आहे. आकर्षक आणि रेखीव मूर्ती मिळत असल्याने गणेशभक्तांची या मूर्तींना चांगलीच मागणी आहे. 

माझ्या मुलाचे अन् सुनेचे दु:ख विसरुन मी मूर्तीकलेत रमलो आहे, ते केवळ नातवांसाठी. गावातील औदुंबर शिंगाडे यांचे आर्थिक सहकार्य मिळत असल्याने ही कला टिकून आहे. मला शेती नाही. बँका कर्ज देत नाहीत. बँकांनी मदत केली तर हा व्यवसाय वाढणार आहे.-गोरख लोहारमूर्तीकार, नान्नज

टॅग्स :SolapurसोलापूरGaneshotsavगणेशोत्सवartकला