मोडनिंबच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी पाठविल्या राख्या
By Appasaheb.dilip.patil | Updated: August 3, 2017 12:42 IST2017-08-03T12:42:01+5:302017-08-03T12:42:27+5:30
मोडनिंब दि ३ : येथील संजीवन विद्यालय व संजयमामा शिंदे प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने देशाच्या सीमेवर लढणाºया सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने सुमारे २०० राख्या पाठविण्यात आल्या .

मोडनिंबच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी पाठविल्या राख्या
आॅनलाइन लोकमत सोलापूर
मोडनिंब दि ३ : येथील संजीवन विद्यालय व संजयमामा शिंदे प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने देशाच्या सीमेवर लढणाºया सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने सुमारे २०० राख्या पाठविण्यात आल्या .
सर्व सैनिका प्रती देश नेहमीच सलाम करत आहे. भारतीय संस्कृती मध्ये सर्वच सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे .यातील बहिण भाऊ याचे पवित्र नाते जपणारा सण म्हणजे 'राखी पौर्णिमा' म्हणूनच या शुभ मुहूर्तावर आपल्या देशासाठी लढणाºया सैनिकांना आपल्या बहिणी ची उणीव भासू नये, या करिता प्रशालेतील विद्याथीर्नीच्या वतीने एक राखी भारतीय जवानांसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे असे प्रशालेच्यावतीने शुभेच्छा पत्रात म्हटले आहे.
या छोट्या उपक्रमातून जवानाप्रती आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सर्व राख्या मोडनिंब पोस्ट आॅफीसचे पोस्ट मास्तर अमोल गाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अमोल सरडे ,दिपक कुंभार,सुहास रोकडे, नीलकंठ पवार, विठ्ठल मुळे,बंडू लोखंडे, गणेश जाधव,सारिका ससाणे, प्रज्ञा काळे,निर्मला सूरवसे ,सिंधू शिरसट,पल्लवी गोरे, सविता शिंदे, अर्चना गिड्डे, प्रिती लवटे,लावण्या इसेकर स्वाती माने,गणेश गुरव यांनी प्रयत्न केले. संस्थेचे अध्यक्ष शिवाजी कांबळे ,सचिव प्रकाश इंगळे ,पालक यांनी शुभेच्छा देऊन या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.
फोटो ओळ : येथील संजीवन विद्यालय व संजयमामा शिंदे प्राथमिक विद्यामंदिर यांच्यावतीने पोस्ट मास्तर अमोल गाडे यांच्याकडे सर्व राख्या सुपुर्द करताना विद्यार्थी़