नियोजन भवनासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय बैठक सुरु
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: October 16, 2023 12:10 IST2023-10-16T12:10:12+5:302023-10-16T12:10:22+5:30
पालकमंत्री चंद्रकांत पाटील नियोजन भवनात दाखल झाले असून त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय बैठका सुरू आहेत.

नियोजन भवनासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय बैठक सुरु
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील नियोजन भवनात दाखल झाले असून त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय बैठका सुरू आहेत. रविवारी, सायंकाळी त्यांच्यावर शाई फेक झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून नियोजन भवनासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लागला आहे.
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त नियोजन भवनात कोणालाही आत सोडेनात. पावणे बारा वाजता पालकमंत्र्यांचे आगमन झाले आहे. त्यानंतर, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचेही आगमन झाले. दुपारी उशिरापर्यंत शासकीय बैठका सुरू राहणार आहेत. पालकमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा असून शाई फेकमुळे त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अतिदक्षता घेत आहे.