तीन गावचा वीजपुरवठा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST2021-05-24T04:21:19+5:302021-05-24T04:21:19+5:30
करमाळा : तालुक्यातील लिंबेवाडी, पोटेगाव, झरे या तीन गावांमधील वीजखांब वादळामुळे आठ दिवसांपूर्वी मोडून पडले आहेत. यामुळे वीजपुरवठा ...

तीन गावचा वीजपुरवठा सुरळीत करा
करमाळा : तालुक्यातील लिंबेवाडी, पोटेगाव, झरे या तीन गावांमधील वीजखांब वादळामुळे आठ दिवसांपूर्वी मोडून पडले आहेत. यामुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, याबाबत करमाळा महावितरणला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख संजय घोलप यांनी निवेदन देऊन दोन दिवसात शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. दोन दिवसात खांब उभे करावे, तसे झाले नाही तर शेतकऱ्यांवर होणारा अन्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापी सहन करणार नाही, हे लक्षात ठेवावे, असा इशाराही दिला आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, तालुका उपाध्यक्ष अशोक गोफणे, तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ बागल, शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, विजय रोकडे, रामभाऊ जगताप, सतीश फंड, आनंद मोरे, तेजस राठोड, अरिफ पठाण, रोहित फुटाणे, सचिन कणसे, किरण कांबळे, महेश डोके, अनिल माने, योगेश काळे, अमोल जांभळे, राजा कुंभार, विजय हजारे, योगेश काळे, स्वप्नील कवडे उपस्थित होते.
---
फोटो २३ करमाळा वीज
ओळी : वादळामुळे जमिनीवर पडलेल्या वीजवाहक तारा शेतकरी काठीने उंच करून ट्रॅक्टरने पेरणी करत आहे.