लसीकरण थांबवणे माझ्या हातात नाही; पालकमंत्री देशमुखांचे प्रणिती शिंदेंना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:02 PM2018-12-11T18:02:17+5:302018-12-11T18:03:19+5:30

ऋषीकेश डोंबाळे मृत्यू : प्रणिती शिंदेंचा विजयकुमार देशमुखांना घेराव

Stop vaccination is not in my hands; Guardian Minister Deshmukh's Praniti Shindena answers | लसीकरण थांबवणे माझ्या हातात नाही; पालकमंत्री देशमुखांचे प्रणिती शिंदेंना उत्तर

लसीकरण थांबवणे माझ्या हातात नाही; पालकमंत्री देशमुखांचे प्रणिती शिंदेंना उत्तर

Next

सोलापूर : ऋषीकेश डोंबाळे मृत्यू प्रकरणानंतर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घालत चुकीच्या पद्धतीने, जबरदस्तीने लस दिली जात असल्याची तक्रार केली़ राज्यभर दिली जात असलेली रुबेला लस तत्काळ थांबवण्याची मागणी केली असता, ही आरोग्याची योजना ही वरूनच आहे, त्याला थांबवणे आपल्या हातामध्ये नसल्याचे पालकमंत्री म्हणाले.


रुबेला लस दिल्यानंतर अत्यवस्थ झालेला औज (द़ सोलापूर) येथील ऋषीकेश डोंबाळे या विद्यार्थ्याचा सोमवारी रात्री मृत्यू झाला़. त्यानंतर रात्री त्याच्या नातेवाईकांनी गर्दी केली़ सकाळी ११.३० वाजता आ़ प्रणिती शिंदे या कार्यकर्त्यांसमवेत शासकीय रुग्णालयात पोहोचल्या. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेसचे बाबा करगुळे, महिला आघाडीच्या सुमन जाधव, तौफिक हत्तुरे, हेमा चिंचोळकर, तिरुपती परकीपंडला, राहुल मर्दा, गणेश गायकवाड, सुभाष वाघमारे आणि राहुल गोयलसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


ऋषीकेशच्या माता-पित्यांची भेट घेऊन सांत्वन केले
पिवळे रेशन कार्ड असतानाही बाहेरून औषधे आणायला लावल्याची तक्रार ऋषीकेशच्या पालकांनी केली़ शासकीय रुग्णालयात प्राथमिक अवस्थेत त्याच्यावर तत्काळ उपचार झाले नाहीत़ एकुलता एक मुलगा गमावल्याचे सांगत त्याच्या मातेने हंबरडा फोडला़
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन आमदार शिंदे म्हणाल्या, आपण पालकमंत्री आहात, जिल्ह्याचे पालक आहात, ही लस तत्काळ थांबवा, तिचा अभ्यास करा, मगच द्या.


जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लस थांबवण्याची केली मागणी 
ऋषीकेशच्या पालकांना भेटून आ़ प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेतली़ यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रत्येक शाळेत दिली जात असलेली लस ही प्रशिक्षणार्थी परिचारिकांच्या हातून ती मुलांना जबरदस्तीने दिली जात असल्याचा आरोप करत पालकांना पूर्वकल्पना वा त्यांच्या संमतीशिवाय दिली जात असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील ही लस देणे आपण थांबवू शकत नसल्याचे सांगत पालकांच्या संमतीने त्यांच्यासमोर देण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्याचे त्यांनी सांगितले़ 


मुलांचा विमा उतरवा मगच लस द्या: नरोटे
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घातल्यानंतर नगरसेवक चेतन नरोटे यांनी पालकांच्या संमतीशिवाय ही लस देण्याचा खटाटोप आरोग्य यंत्रणेचा सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करत हे असेच चालू राहिले तर आणखी दहा मुलांचे बळी जातील, असे म्हणाले़ तत्पूर्वी तज्ज्ञांनी, नियुक्त वैद्यकीय पथकाने या लसीचा अभ्यास करून ती द्यावी, त्याही आधी सर्व मुलांवर सुरक्षा विमा उतरवावा, मगच ती लस द्यावी, अशी मागणी केली़ तसेच ऋषीकेश हा डोंबाळे पालकांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली़


वातावरण तापले, प्रशासनाचे कोणीच भेटले नाही
शासकीय रुग्णालयात ऋषीकेशच्या नातेवाईकांना भेटायला आलेल्या आ़ प्रणिती शिंदे यांना तापलेल्या वातावरणात प्रशासनाचे जबाबदार अधिकारी कोणीच भेटू शकले नाहीत़ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांच्या तत्काळ असहकार्याची बाब त्यांच्यापुढे आली़ येथील असहकार्य, गैरसोयीचा पाढाही आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्र्यांपुढे वाचला.

Web Title: Stop vaccination is not in my hands; Guardian Minister Deshmukh's Praniti Shindena answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.