चोरलेलं मंगळसूत्र वीस वर्षांनी सापडलं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:23 IST2021-03-10T04:23:31+5:302021-03-10T04:23:31+5:30
त्याचे असे झाले २००१ साली कमल गोरे या महिलेचे मणिमंगळसूत्र चोरीस गेले होते. तपास करताना कुर्डूवाडी पोलिसांनी सापळा ...

चोरलेलं मंगळसूत्र वीस वर्षांनी सापडलं!
त्याचे असे झाले २००१ साली कमल गोरे या महिलेचे मणिमंगळसूत्र चोरीस गेले होते. तपास करताना कुर्डूवाडी पोलिसांनी सापळा रचून त्या संबंधीत चोरांना मुद्देमालासह पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे माढा कोर्टातून सोन्याचे मणिमंगळसूत्र महिलेस देण्याचा आदेश झाला. मग उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल दुर्गा चौगुले यांच्या हस्ते त्या महिलेस ते सुपुर्द करण्यात आले. त्या वेळेस ती महिला भावनिक झाली. घामाचं पाणी करुन घेतलेलं मंगळसूत्र तब्बल वीस वर्षांनी मिळालं यावर क्षणभर तिचा विश्वासच बसला नाही. पण हे सत्य असल्याने त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले.
यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे, महिला पोलीस दुर्गा चौगुले, महिला पोलीस नाईक मेघा आगवणे यांची उपस्थिती होती.
----
कुर्डूवाडी येथील कमल गोरे या महिलेस मंगळसूत्र परत करताना उपविभागीय अधिकारी विशाल हिरे,पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे,पोलीस दुर्गा चौगुले,मेघा आगवणे.
----