शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील प्रवाशांचा चोरुन उजनी जलवाहतूक मार्गे करमाळ्यात शिरकाव...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 15:10 IST

कोरोनाचा धोका; जिल्हाबंदीच्या आदेशाला फासला जातोय हरताळ

ठळक मुद्देकोरोनाचा प्रकोप पुणे जिल्ह्यात वाढत चालल्याने आपला जीव वाचवण्यासाठी जो तो मिळेल त्या मार्गाने पुणे जिल्हा सोडत आहेकरमाळा तालुक्यात आई-वडील, नातेवाईक यांच्याकडे सुरक्षित राहण्यासाठी येनके न प्रकारे लोक येत आहेतकरमाळा तालुक्यात आई-वडील, नातेवाईक यांच्याकडे सुरक्षित राहण्यासाठी येनके न प्रकारे लोक येत आहेत

करमाळा : लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी सुरू असताना पुणे जिल्ह्यातून काही प्रवासी हे उजनी जलमार्गे करमाळ्यात शिरकाव करतानाचा प्रकार पुढे आला आहे़ मच्छिमार बोटीतूून अवैधरित्या प्रवास करून क रमाळा तालुक्यात कोरोनाचा धोका वाढवत आहेत.

 करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातून भीमा नदी वाहते.  माढा तालुक्यातील भीमानगर  येथे भीमानदीवर उजनी धरण  बांधले गेले. सर्वसाधारणपणे तालुक्यातील जिंतीपासून उजनी धरणात पाणीसाठा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड व सोलापूर  ९ जिल्ह्यातील करमाळा,     माढा हे भीमा नदीच्या काठावर वसले आहेत. 

इंदापूर (पुणे) तालुक्यातून करमाळ्यात (सोलापूर) तालुक्यात उजनी धरणातील जलमार्गाने अर्थात नाव, बोटीच्या माध्यमातून कमी वेळेत पोहोचता  येते.  कोरोना विषाणूचा फै लाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी केली आहे़ दोन जिल्ह्याच्या सरहद्दीवर तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत़ त्यामुळे सहजासहजी कोणालाही प्रवेश करता येत नाही. 

कोरोनाचा प्रकोप पुणे जिल्ह्यात वाढत चालल्याने आपला जीव वाचवण्यासाठी जो तो मिळेल त्या मार्गाने पुणे जिल्हा सोडत आहे. करमाळा तालुक्यात आई-वडील, नातेवाईक यांच्याकडे सुरक्षित राहण्यासाठी येनके न प्रकारे लोक येत आहेत. प्रवासी वाहतुकीसाठी यांत्रिक नाव बंद आहेत़ पण मच्छिमारही पैशाच्या आमिषापोटी बोटीतून प्रवासी वाहतूक करत आहेत.

पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे- करमाळा तालुक्यात सुदैवाने कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही़ पण बाहेरचे लोक बोटीतून येऊ लागल्याने धोका निर्माण झाला आहे. याकडे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख व  पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणेkarmala-acकरमाळाwater transportजलवाहतूकcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस