शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील पुतळा विटंबना प्रकरण; एनएसयूआयच्या फलकावर शाई फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 11:40 IST

विद्यार्थी परिषदेच्या विरोधात दिली तक्रार; सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर घोषणाबाजी अन् निदर्शने

ठळक मुद्देदिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी १२ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानिवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी जिल्ह्यात असणाºया विद्यार्थी संघटनात आताच वाद सुरू

सोलापूर : दिल्ली येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे पडसाद सोलापूर शहरात पडले. जिल्हा परिषदेसमोरील काँग्रेस भवन येथे असणाºया एनएसयुआयच्या (नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया) फलकावर शाई फेकण्यात आली. या विरोधात एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यावेळी भगतसिंग जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या. हा पुतळा दिल्ली विद्यापीठाच्या परवानगीशिवाय लावण्यात आल्याचा अरोप एनएसयुआयने केला होता. बुधवारी रात्री एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील हिंदुत्ववादी संघटना सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोरील काँग्रेस भवन येथे आले. कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन निदर्शने केली. हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद, कृषी गोसेवा संघ यांच्या कार्यकर्त्यांनी एनएसयुआयच्या फलकावर काळी शाई फेकली. यावेळी एनएसयुआय मुर्दाबाद, भारत मात की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, अशा घोषणाही देण्यात आल्या. गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता गणेश डोंगरे यांना एनएसयुआयच्या  फलकावर शाई फेकल्याचे कळले. तिथे नगरसेवक विनोद भोसले, युवक कॉँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष तिरुपती परकीपंडला हे देखील आले. त्यांनी झालेल्या प्रकाराविरोधात एनएसयुआयकडून समर्थ बंडे, सुधीर बहिरवडे, यतिराज होनमाने, किरण जाधव, संकेत अटकळे, चिदंबर कारकल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

राजकारण तापले !- दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी १२ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर तेथील विद्यार्थी राजकारण चांगलेच तापले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी जिल्ह्यात असणाºया विद्यार्थी संघटनात आताच वाद सुरू झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर