रविवारी भारतीय जैन संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST2020-12-05T04:45:30+5:302020-12-05T04:45:30+5:30

सोलापूर : भारतीय जैन संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय डब्ल्यूआयटी येथील ...

State level convention of Indian Jain Association on Sunday | रविवारी भारतीय जैन संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

रविवारी भारतीय जैन संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

सोलापूर : भारतीय जैन संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय डब्ल्यूआयटी येथील मेकॅनिकल हॉलमध्ये ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष केतनभाई शहा यांनी दिली.

भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३५ वर्षे संघटनेचे काम काम सुरू आहे. राज्य अध्यक्ष हस्तिमल बंब यांच्या काळात राज्यात जवळजवळ २०० रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांची सेवा केली. अडीच लाख रुग्णांच्या तपासणीतून ५०,००० पॉझिटिव्ह रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. राज्यामध्ये आजपर्यंत जवळजवळ १७ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली. मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, ठाणे अशा अनेक ठिकाणी कोविड काळात संघटनेने काम केले आहे. या काळात ब्लड डोनेशनच्या माध्यमातून राज्यात पंधरा हजार रक्त बॉटल संकलित करून ब्लड बँकेला दिले आहेत. याच धर्तीवर सोलापुरात राज्य उपाध्यक्ष केतन भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली ५५ दिवस ‘डॉक्टर आपल्या दारी’ या उपक्रमातून सहा हजार रुग्णांची तपासणी करून औषधे दिली. रविवारी होणाऱ्या राज्य अधिवेशन कार्यक्रमास कोरोनाचे नियम पाळून सोलापूर, उस्मानाबाद, जिल्ह्यातून लोक येणार या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

Web Title: State level convention of Indian Jain Association on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.