मोडनिंबमध्ये स्टेट बँकेची शाखा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:40 IST2021-02-18T04:40:10+5:302021-02-18T04:40:10+5:30

यावेळी क्षेत्रीय व्यवस्थापक विनोद कुमार मुख्य व्यवस्थापक रणधीर सिंग, मोडनिंब शाखा व्यवस्थापक विशाल हिंगणे यांच्यासह जि. प. सदस्य भारत ...

State Bank branch opened in Modenimb | मोडनिंबमध्ये स्टेट बँकेची शाखा सुरु

मोडनिंबमध्ये स्टेट बँकेची शाखा सुरु

यावेळी क्षेत्रीय व्यवस्थापक विनोद कुमार मुख्य व्यवस्थापक रणधीर सिंग, मोडनिंब शाखा व्यवस्थापक विशाल हिंगणे यांच्यासह जि. प. सदस्य भारत शिंदे, समाजी सभापती शिवाजी कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सौदागर जाधव, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, बाजार समितीचे संचालक रविकांत शहा, मोहन मोरे, नागनाथ पाटील

यांच्यासह माजी सरपंच बाबुराव सुर्वे, सदाशिव पाटोळे, जयसिंग गिड्डे, दत्तात्रय सुर्वे, नागनाथ ओहोळ व कुरण गिड्डे शिवसेना शहराध्यक्ष संदेश तोडकरी, रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण व्यवहारे यांच्यासह सयाजी पाटील, डॉ. सुहास शहा, ॲड. प्रवीण पाटील यासह मोडनिंब परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी संजय श्रीवास्तव यांनी कर्जदारांनी चांगला व्यवसाय करून स्वतःला बँकेचा फायदा करून वेळेवर कर्जाची परतफेड करावी. लहान मोठ्या उद्योजकांना शेतकऱ्यांसह सर्व घटकांना कर्ज देण्यासाठी बँक सदैव तत्पर असते त्यामुळे मोडनिंब परिसरातील नागरिकांनी आमच्या शाखेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

-----

Web Title: State Bank branch opened in Modenimb