सोलापूरात लोकमत सखी मंच प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 12:10 IST2017-07-22T12:10:32+5:302017-07-22T12:10:32+5:30

-

Start of Premier League Cricket Tournament in Solapur | सोलापूरात लोकमत सखी मंच प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

सोलापूरात लोकमत सखी मंच प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २२ : लोकमत सखी मंच प्रिमिअर लिग या सोलापूरातील पहिल्या महिला क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले़
यावेळी लोकमत सोलापूर चे संपादक राजा माने, जाम मिलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश दमाणी, जामश्री क्रिकेट अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव देसाई, मुख्य प्रशिक्षक अनिल साम्राणी, माया खंडी, श्री धुत सारीजचे राजगोपालजी धुत, चंदन धुत आदी मान्यवर उपस्थित होते़
श्री़ धुत सारीज, लोकमत सखी मंच, सेडा यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ या स्पर्धा २२ व २३ जुलै रोजी होणार आहेत़ या स्पर्धेत १५ संघ सहभागी झाले आहेत़ या स्पर्धेचा अंतिम सामना २९ जुलै रोजी होणार आहे़ पंच म्हणून माया खंडी व संजय मोरे हे काम पाहत आहेत़
यावेळी महापौर शोभा बनशेट्टी म्हणाल्या की, लोकमत हे उत्तम व्यासपीठ आहे़ लोकमत मुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळणार आहेत असे सांगितले़
----------------
असे होतील सामने
२२ जुलै रोजी निमा हिरकणी विरूध्द पुढे चाल, नवी पेठ विरूध्द कर्णिकनगर, मंगल ग्रुप विरूध्द अवंतीनगर, विजापूर रोड विरूध्द सोलापूर शहर महिला पोलीस, जेसीए वॉरिअर्स विरूध्द दमाणीनगर, इंद्रधनु विरूध्द चौडेश्वरी गु्रप, पूर्व विभाग विरूध्द सम्राट चौक, आणि जुळे सोलापूर विरूध्द पुढे चाल असे सामने होतील़
२३ जुलै रोजी पहिला उपांत्यपूर्व सामना १० वाजता, दुसरा उपांत्यपूर्व सामना ११, तिसरा उपांत्यपूर्व सामना १२ तर चौथा उपांत्यपूर्व सामना १ वाजता होईल़ त्यानंतर दुपारी ३ वाजता अंतिम सामना होईल़ त्यानंतर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ होणार आहे़

Web Title: Start of Premier League Cricket Tournament in Solapur