आज चांदापुरीत एक लाख औदुंबर वृक्ष लागवडीचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST2021-07-09T04:15:27+5:302021-07-09T04:15:27+5:30
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सकाळी नऊ वाजता भरणेवाडी (ता. इंदापूर) येथून चांदापुरी (ता. माळशिरस)कडे प्रयाण होईल. दहा वाजता चांदापुरी ...

आज चांदापुरीत एक लाख औदुंबर वृक्ष लागवडीचा प्रारंभ
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सकाळी नऊ वाजता भरणेवाडी (ता. इंदापूर) येथून चांदापुरी (ता. माळशिरस)कडे प्रयाण होईल. दहा वाजता चांदापुरी येथे आगमन होईल. येथे महालक्ष्मी वृक्ष लागवड प्रा. लि. (पंढरपूर) यांच्यामार्फत चेअरमन अरुण काळे यांनी एक लाख औदुंबर वृक्ष लागवड कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
चांदापुरी येथून पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पालखी आढावा बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. पंढरपूर येथून मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी शताब्दी महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून हिप्परगी (ता. उत्तर सोलापूर) येथे हिप्परगा तलाव पाहणी व वृक्षारोपण येथून सोलापूर येथे नियोजन भवन येथे कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक, त्यानंतर महिला हॉस्पिटल (आसरा चौक) येथील सुकन्या समृद्धी योजना तीन वर्षांमध्ये जन्मलेल्या मुलींना मोफत पीपीएफ खाते वाटप कार्यक्रम आटोपून इंदापूर तालुक्याकडे प्रयाण. इंदापूर येथील कै. रत्नाकर तात्या मुखरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून सायंकाळी भरणेवाडी येथे मुक्काम करणार असल्याचे विशेष कार्य. अधिकारी डॉ. लहू वडापुरे यांनी सांगितले.
या नियोजित दौऱ्याच्या प्रती जिल्हाधिकारी (पुणे, सोलापूर), पोलीस आयुक्त (पुणे, सोलापूर), पोलीस अधीक्षक (पुणे-सोलापूर) आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, निवासी उपजिल्हाधिकारी (पुणे व सोलापूर) अधीक्षक अभियंता (पुणे व सोलापूर) पशुसंवर्धन आयुक्त (पुणे), अप्पर आयुक्त मृद व जलसंधारण प्रादेशिक विभाग पुणे यांना दौऱ्याचे नियोजन कळविलेले आहे.