निर्बंधासह बार्शीची बाजारपेठ सुरू करा; लोकप्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST2021-06-04T04:18:20+5:302021-06-04T04:18:20+5:30

व्यापारासाठी घेतलेल्या बॅंकेच्या कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, लाइट बिल, विविध शासकीय कर याबाबतीत ते मेटाकुटीला आले आहेत. सर्व व्यावसायिकांवर ...

Start a barshi market with restrictions; Demand of people's representatives to the District Collector | निर्बंधासह बार्शीची बाजारपेठ सुरू करा; लोकप्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

निर्बंधासह बार्शीची बाजारपेठ सुरू करा; लोकप्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

व्यापारासाठी घेतलेल्या बॅंकेच्या कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, लाइट बिल, विविध शासकीय कर याबाबतीत ते मेटाकुटीला आले आहेत. सर्व व्यावसायिकांवर निर्बंध घालून इतर दुकाने सुरू करण्यासाठी ग्रामीण भाग म्हणून बार्शीचा स्वतंत्र प्रस्ताव पाठवावा या आमदार राजेंद्र राऊत यांच्या विनंतीला जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्याची ग्वाही मिलिंद शंभरकर यांनी व्यापाऱ्यांच्या या शिष्टमंडळाला दिल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

आत्तापर्यंतच्या कडक लॉकडाऊनचा परिणाम पाहता बार्शी शहर व तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये घट होताना दिसत असून येथील पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांच्या खाली आहे. या बाबींचा सहानुभूतीने विचार करता बार्शी बाजार पेठेतील सर्व दुकाने, छोटे व्यावसायिक यांना निर्बंध घालून इतर दुकाने सुरू करावी, अशी मागणी केली.

या मागणीसाठी बार्शीतील व्यापारी संघटनांचे शिष्टमंडळाने आमदार राजेंद्र राऊत व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लोढा, संजय खांडवीकर, विनोद बुडूख, अविनाश तोष्णीवाल उपस्थित होते.

===Photopath===

030621\img-20210603-wa0014.jpg

===Caption===

बार्शीतील व्यापारी संघटनांचे शिष्टमंडळाने आमदार राजेंद्र राऊत व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि. 3 जून रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली.

Web Title: Start a barshi market with restrictions; Demand of people's representatives to the District Collector