सोलापूरजवळ एसटी बस - टँकरचा अपघात, १२ प्रवाशी जखमी
By Admin | Updated: June 20, 2017 12:26 IST2017-06-20T12:26:50+5:302017-06-20T12:26:50+5:30
-

सोलापूरजवळ एसटी बस - टँकरचा अपघात, १२ प्रवाशी जखमी
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २० : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तोगराळी गावानजीक एसटी बस सिमेंट टँकरवर आदळली. या अपघातात बसमधील १२ प्रवासी जखमी झाले. ही घटना सोमवारी उशिरा घडली.
जवाहर नवलचंद दोशी (वय ७४), शांताबाई स्वामीराव हरवाळकर, गंगाधर विठोबा हाताळे, इरप्पा दत्तात्रय कुंभार, प्रकाश रामचंद्र पोतदार (वय ६७), राणी माळी, निशिकांत दंडगळ, स्वामीराव घाटगे, भीमबाई घाटगे, धानबाई कांबळे, वसंत मोरे, आशाबाई जैनझागडे अशी जखमींची नावे आहेत.
अक्कलकोट डेपोमधून (एमएच १४-बीटी ०८३९) या क्रमांकाची बस तोगराळी गावाकडे जात होती. त्यावेळी सिमेंट टँकरने अचानक ब्रेक मारल्याने बस टँकरवर आदळली. या अपघातात बसमधील १२ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.