एसआरपीएफ' पोलिसाचे घर फोडले; तीन लाखाचे दागिने नेले चोरूनं

By संताजी शिंदे | Updated: August 20, 2023 19:29 IST2023-08-20T19:29:29+5:302023-08-20T19:29:32+5:30

आतमध्ये पाहिले असता चोरट्याने कपाटातील दोन लाख ९३ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदिचे दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले

SRPF' policeman's house smashed; Jewels worth three lakhs were taken away and stolen | एसआरपीएफ' पोलिसाचे घर फोडले; तीन लाखाचे दागिने नेले चोरूनं

एसआरपीएफ' पोलिसाचे घर फोडले; तीन लाखाचे दागिने नेले चोरूनं

सोलापूर : राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) च्या पोलिसाचे घर फोडून अज्ञात चोरट्याने आतील सोन्या चांदीचे दागिने व अन्य साहित्य मिळून २ लाख ९३ हजाराच्या ऐवजाची चोरी केली. ही चोरी १८ रोजी सायंकाळी ५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान झाली.

महेश बंकटेश थोरात (वय ४० रा. रा. सरस्वती बिल्डींग एसआरपी कॅम्प) यांनी विजापूर रोडवरील एजी पाटील कॉलेच्या पाठीमागे घर घेतले आहे. नवीन घर घेतल्याने ते कॅम्पमधून घर सामान शिफ्ट करीत होते. १८ ऑगस्ट रोजी त्यांनी आर्धे सामान शिफ्ट केले होते. आर्ध सामान एसआरपी कॅम्प येथेच असल्याने नविन घराला कुलूप लावून ते झोपण्यासाठी जुन्या घरी गेले होते. सकाळी पुन्हा नवीन घरी आले तेव्हां त्यांना घराच्या गेटचेव दरवाज्याचे कुलूप तुटलेल्या आवस्थेत दिसून आले. आतमध्ये पाहिले असता चोरट्याने कपाटातील दोन लाख ९३ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदिचे दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास फौजदार गायकवाड करीत आहेत

Web Title: SRPF' policeman's house smashed; Jewels worth three lakhs were taken away and stolen