श्रीकांचना यन्नम यांची अन्नछत्रला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:43 IST2021-02-05T06:43:55+5:302021-02-05T06:43:55+5:30
चपळगाव : अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे ...

श्रीकांचना यन्नम यांची अन्नछत्रला भेट
चपळगाव : अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सदिच्छा भेट दिली.
संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक देवेंद्र कोठे, मल्लिनाथ सकट उपस्थित होते.
याप्रसंगी स्वामीभक्त हर्षल माने, राजश्री गागरे, सुशील कारखानीस, शशिकांत ताटे-देशमुख, यवतमाळचे परिवहन अधिकारी परेश गावसाने यांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, नामा भोसले, प्रवीण घाडगे, समर्थ घाडगे, बाळासाहेब घाडगे, प्रशांत साठे, गोविंदराव शिंदे, सतिश महिंद्रकर, दत्ता माने, सिद्धाराम कालीबत्ते, संदीप भोसले, महांतेश स्वामी उपस्थित होते.
----
मान्यवरांनी दिल्या भेटी...
मागील आठवड्यात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास लाॅन टेनिसपटू नंदन बाळ, डाॅ.वैश्यंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.संजीव ठाकूर, राजकीय विश्लेषक रश्मी पुराणिक, कोल्हापूरचे हरिभक्त बालयोगी श्रीकृष्ण महाराज, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक गोविंदराव पाटील, महाराष्ट्र अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे, कराड येथील माई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका संगीता साळुंखे, तुळजापूरचे सहदिवाणी प्रथम वर्ग दंडाधिकारी मनीषा जसवंत,मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष अधिकारी दीपक खानविलकर, सियेट टायरचे सरव्यवस्थापक धनंजय कुलकर्णी, गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी अशोकराव जाधव, बॅँक ऑफ इंडिया मुंबई प्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी ऋतुज पाचगरे, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, गंगाखेडचे माजी आमदार डाॅ. मधुसूदन केंद्रे, कोल्हापूरचे माजी महापौर सागर चव्हाण यांनी भेटी दिल्या. संस्थापक जन्मेंजय महाराज भोसले व प्रमुख विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
----
२८ अन्नछत्र
अक्कलकोट अन्नछत्र मंडळाला भेट दिल्यानंतर महापौर श्रीकांचना यन्नम यांचा सत्कार करताना अमोलराजे भोसले.