श्री श्री रविशंकर गुरूजी आज पासून महाराष्ट्र दौऱ्यावर

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 31, 2023 12:14 IST2023-01-31T12:14:27+5:302023-01-31T12:14:38+5:30

आर्ट आफ लिव्हिंगचे संस्थापक श्री रविशंकर गुरुजी हे ३१ जानेवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

Sri Sri Ravi Shankar Guruji on Maharashtra tour from today | श्री श्री रविशंकर गुरूजी आज पासून महाराष्ट्र दौऱ्यावर

श्री श्री रविशंकर गुरूजी आज पासून महाराष्ट्र दौऱ्यावर

सोलापूर :

आर्ट आफ लिव्हिंगचे संस्थापक श्री रविशंकर गुरुजी हे ३१ जानेवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असून, गुरुवार, २ फेब्रुवारी रोजी ते तुळजापूर येथे येत आहेत. नळदुर्ग रोड येथील स्कूल मैदान येथे त्यांचा जागर भक्तीचा हा सत्संग कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी ते तुळजापूर येथे मुक्कामी राहतील.

त्यापूर्वी ३१ जानेवारीला कोल्हापूर येथे त्यांचा महासत्संग कार्यक्रम होणार आहे. १ फेब्रुवारीला महालक्ष्मी मंदिरात ‘देवी होमा’ कार्यक्रम होईल. संध्याकाळी त्यांचा मुक्काम नांदेड येथे असणार आहे. नांदेडला त्यांचा महासत्संग होईल. त्यानंतर, ते गुरुद्वारला भेट होईल. जालन्यातील वाटूर येथे २ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी श्री रविशंकर गुरुजींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमानंतर ते तुळजापूरकडे रवाना होतील. सायंकाळी त्यांचे तुळजापुरात आगमन होईल.

Web Title: Sri Sri Ravi Shankar Guruji on Maharashtra tour from today