शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरातील अनधिकृत बांधकाम तपासणीसाठी पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 14:46 IST

अनधिकृत बांधकाम असणाºयांना शासनाने दिलासा दिला तरी बांधकाम नियमित करून घेण्यासाठी नागरिक पुढे आलेले नाहीत. मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी ही चांगली योजना असल्याने बांधकाम विभागातील प्रत्येक अवेक्षकांना त्यांच्या हद्दीतील बांधकामे तपासून नोटिसा देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

ठळक मुद्देप्रत्येक अवेक्षकांना हद्दीतील बांधकामे तपासून नोटिसा देण्याची जबाबदारीनोव्हेंबर व डिसेंबरमध्ये करवसुलीवर भर देणार - आयुक्तथकबाकीदारांनी स्वत:हून पैसे भरण्यास पुढे आल्यास त्यांना सवलती देऊ

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : अनधिकृत बांधकाम असणाºयांना शासनाने दिलासा दिला तरी बांधकाम नियमित करून घेण्यासाठी नागरिक पुढे आलेले नाहीत. मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी ही चांगली योजना असल्याने बांधकाम विभागातील प्रत्येक अवेक्षकांना त्यांच्या हद्दीतील बांधकामे तपासून नोटिसा देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बांधकाम विभागाची बैठक घेतली. शासनाच्या नव्या अध्यादेशाला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यासाठी बांधकाम विभागातील अवेक्षकांचे बांधकाम तपासणीसाठी एक पथक तयार करण्याची सूचना आयुक्तांनी केली. बांधकाम परवाना विभागाचे उपअभियंता रामचंद्र पेंटर यांच्या अधिपत्याखाली हे पथक कार्यरत राहणार आहे. अनधिकृत बांधकामे दंड भरून नियमित करण्याच्या नियमात दुरुस्ती करून शासनाने नवा अध्यादेश जारी केला आहे.  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ (क) नुसार ३१ डिसेंबर २0१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे दंड स्वीकारून नियमित करण्याला मान्यता देण्यात आली आहे. याप्रमाणे नियमानुसार मर्यादित उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती (एफएसआय ३0 टक्क्यांपर्यंत मर्यादा), अनुज्ञेय वापराव्यतिरिक्त अन्य वापर असलेली बांधकामे (निवासी इमारतीचा वाणिज्य वापर), मंजूर एफएसआयपेक्षा जास्त एफएसआय वापरण्यात आलेल्या इमारती, ३0 टक्के मर्यादित किंवा टीडीआर घेऊन, मंजूर सामासिक अंतरापेक्षा कमी सामासिक अंतरे सोडून केलेले बांधकाम, मंजूर पार्किंगपेक्षा कमी जागा असलेली इमारत (लगतच्या जागेत किंवा मेकॅनिक पार्किंग दर्शविणे), डक्टची मोजमापे कमी सोडलेली असल्यास त्यामध्ये मर्यादेपर्यंत सूट देणे, जिना, पॅसेज, बाल्कनी, टेरेसचा गैरवापर केल्यास अशी बांधकामे नियमित करता येणार आहेत.  शहरात अनधिकृत बांधकामाची संख्या मोठी आहे. नियमातील सुधारणांमुळे या बांधकामदारांना फायदा होणार आहे. दंड लागू करण्याची पद्धत विकास शुल्काच्या नियमाप्रमाणे असणार आहे. पण नागरिकांना याची माहिती नसल्याने या योजनेचा लाभ घेण्यास कोणी पुढे आलेले नाही. ज्यांचे असे बांधकाम आहे त्यांना नोटीस दिल्यास याला चालना मिळणार आहे. ------------------------दोन महिने करवसुली.......च्आता नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये करवसुलीवर भर देणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. जीएसटीपोटी येणारे अनुदान वेतन व इतर बाबींवर खर्च होत आहे. विकासकामासाठी तिजोरीत पैसा नसल्याने आता करवसुलीशिवाय पर्याय नाही. मोठ्या थकबाकीदारांविरूद्ध मोहीम राबविण्याचे त्यांनी संकेत दिले. थकबाकीदारांनी स्वत:हून पैसे भरण्यास पुढे आल्यास त्यांना सवलती देऊ. अन्यथा कारवाई करून पैसे वसूल केली जातील, असा इशारा त्यांनी दिला.