विजेच्या धक्क्याने क्रीडा शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:17+5:302021-02-05T06:46:17+5:30

पंढरपूर : शेतामध्ये विजेचा धक्का लागून एका क्रीडा शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे घडली. प्रा. विजयकुमार ...

Sports teacher dies of electric shock | विजेच्या धक्क्याने क्रीडा शिक्षकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने क्रीडा शिक्षकाचा मृत्यू

पंढरपूर : शेतामध्ये विजेचा धक्का लागून एका क्रीडा शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे घडली.

प्रा. विजयकुमार घाडगे असे विजेच्या धक्क्याने मरण पावलेल्या क्रीडा शिक्षकाचे नाव असून मंगळवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली.

याबाबत चुलते अमरदीप अनंत घाडगे (रा. अजनसोंड, ता.पंढरपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. सकाळी प्रा. घाडगे शेतामध्ये गेले होते. तेथे विजेच्या पोलला स्पर्श होऊन विजेचा धक्का बसला. गावातील संभाजी चव्हाण यांनी सकाळी ११ वाजता अमरदीप यांच्याशी फोनवर संपर्क साधला. चुलत पुतण्या प्रा. विजयकुमार घाडगे यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची माहिती दिली.

त्यांनी तत्काळ सुस्ते येथील चुलतभाऊ उत्तम शंकर घाडगे यांच्या शेताकडे धाव घेतली. यावेळी उत्तम घाडगे, मारुती बापूराव घाडगे व इतर नातेवाईक जमा झाले. प्रा. विजयकुमार घाडगे यांना खासगी वाहनातून पंढरपूर येथे सरकारी दवाखान्यात आणले. परंतु उपचारापूर्वीच प्रा. विजयकुमार घाडगे यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले.

----

विद्यार्थीप्रिय शिक्षक

प्रा. विजयकुमार घाडगे हे उमा महाविद्यालयात दोन वर्षांपासून क्रीडा शिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांचे शिक्षण एमपी.एड. झाले. ते सेट परीक्षेतही उत्तीर्ण होते. उमा कॉलेजमध्ये येण्यापूर्वी पुणे येथे ते एका खासगी अकॅडमीमध्ये एमपीएससी, यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाबाबत मार्गदर्शन करीत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास १२ मुलांनी पीएसआय पदापर्यंत मजल मारली आहे. विद्यार्थ्यांमध्ये रमणारे, सर्वांशी खेळीमेळीच्या वातावरणात वागणारे, मनमिळाऊ स्वभाव असलेले विद्यार्थीप्रिय शिक्षक प्रा. विजयकुमार घाडगे होते. उमा कॉलेजमध्ये नोकरीला लागल्यानंतर कुटुंबातील लोकांनी त्यांच्या लग्नासाठी हालचाली सुरू होत्या. परंतु कोरोनामुळे कॉलेज बंद असल्याने घरी होते.

---

Web Title: Sports teacher dies of electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.