बोलक्या भिंती; रेखाटलेले पाढे, नकाशे, आकृत्या अन् धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:49 IST2021-09-02T04:49:02+5:302021-09-02T04:49:02+5:30
सोलंकरवाडी हे दीड हजार लोकसंख्या असलेले छोटंसं गाव आहे. पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची एक शाळा, तर पहिली ते ...

बोलक्या भिंती; रेखाटलेले पाढे, नकाशे, आकृत्या अन् धडे
सोलंकरवाडी हे दीड हजार लोकसंख्या असलेले छोटंसं गाव आहे. पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची एक शाळा, तर पहिली ते चौथीपर्यंतच्या दोन वस्ती शाळा गावात आहेत. शाळेतील पटसंख्या १३८ असून त्यासाठी एकूण ८ शिक्षक कार्यरत आहेत. गावात इंटरनेटचा अभाव आहे. विजेचाही सतत लपंडाव सुरू असतो. अनेकांकडे स्मार्ट फोनदेखील नाहीत. यामुळे ऑनलाइन शिक्षणातही अनेक अडथळे येत होते. अशा परिस्थितीत आपल्या गावातील मुलांचा अभ्यास बंद होऊ नये, या उद्देशाने येथील केंद्रप्रमुख रामकृष्ण केदार व ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष विक्रम भांगिरे यांनी आपलं गाव हे अभ्यासाचं गाव साकारण्याची संकल्पना मांडली. त्यात सरपंच अनंता गलांडे, उपसरपंच शकुंतला शेंडगे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन कामास सुरुवातही केली. मग काय बघता बघता गावातील घराच्याही भिंती बोलू लागल्या आहेत. मुले ते पाहत पाहत चालता-बोलता अभ्यास करू लागली आहेत. या उपक्रमाची दखल घेऊन पंचायत समिती सदस्य साधना पाटील, गटविकास अधिकारी संताजी पाटील, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके आदींनी भेटी दिल्या आहेत.
........
शिक्षकांना ग्रामस्थांची साथ या कामास शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष वामन यादव, मुख्याध्यापक बाळराजे पाटील, शिक्षक शिवाजी शिंदे, परमेश्वर सुरवसे, सुषमा बारबोले, धनाजी थिटे, अर्चना मारकड, दत्तात्रय मोरे, विशाल धस यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. गावातील मोक्याच्या ठिकाणची घरे, मंदिरे, शाळा, शौचालय, पाण्याच्या टाक्या, सार्वजनिक इमारतींच्या भिंती ह्या विविध विषयांच्या शालेय माहितीने रेखाटण्यात आल्या आहेत. पेंटर जगन्नाथ शिंदे, अतिष ढावरे, विकास जाधव, योगेश सोनकांबळे हे नाममात्र मोबदल्यात भिंती रंगवित आहेत.
........
कोरोना काळात मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने अभ्यासाचं गाव साकारण्यात येत आहे. गावातील अनेक भिंतीवर अभ्यासाचे धडे रेखाटण्यात आले आहेत. मुले चालता बोलता शिकू लागले आहेत.
-अनंता गलांडे, सरपंच
.........
(फोटो ओळ
माढा तालुक्यातील सोलंकरवाडीत अभ्यासचं गाव म्हणून रेखाटताना पेंटर.
(फोटो १ सोलंकरवाडी)
280821\08083909img-20210824-wa0457.jpg~280821\08083910img-20210828-wa0275.jpg
सोलंकरवाडी ता माढा येथील बोलक्या भिंती पाहताना गटविकास अधिकारी संताजी पाटील,गटशिक्षणाधिकारी मारुती फडके,सरपंच अनंता गलांडे,व नागरिक~गावातील भिंती रेखाटन्याचं काम करताना पेंटर