शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणची विशेष पथके

By appasaheb.patil | Updated: March 24, 2020 12:06 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणची यंत्रणा सज्ज: अत्यावश्यक सेवेचेही केले नियोजन

ठळक मुद्देकोरोनासंदर्भातील खर्चाचे अधिकार  कार्यालय प्रमुखांनाअत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडूच नयेतक्रार किंवा माहिती देण्यासाठी महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधा

सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील यंत्रणा अत्यावश्यक सेवेसाठी सज्ज झाली आहे. आरोग्याची योग्य खबरदारी घेऊन अभियंता व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य देत कर्तव्य बजावत आहेत. अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून विशेष पथके (अभियंता/कर्मचारी/जनमित्र) निर्माण करण्यात आली असून घरी बसलेल्या लोकांसाठी २४ तास सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणची यंत्रणा कटिबद्ध असल्याची माहिती सोलापूर महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ ला  दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. जमावबंदी, संचारबंदीचा आदेश तसेच घरुनच काम (वर्क फ्रॉम होमचा) निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. 

त्याप्रमाणे महावितरणकडून विविध उपाययोजनांसह वीजपुरवठ्याच्या अत्यावश्यक सेवेसाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांत ५ टक्के उपस्थितीची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी प्रामुख्याने अभियंता आणि तांत्रिक कर्मचारी (जनमित्र) सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज आहेत.

कोरोनासंदर्भातील खर्चाचे अधिकार  कार्यालय प्रमुखांनाप्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाºया अभियंता व तांत्रिक कर्मचाºयांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. तसेच कार्यालय प्रमुखांना मास्क, लिक्विड हॅण्डवॉश, सॅनेटायझर खरेदी करण्यासाठी खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत. यासोबतच दुरुस्तीच्या कामासाठी जाताना अभियंता व जनमित्रांनी स्वत:चे ओळखपत्र सोबत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो तत्परतेने पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत; मात्र काही गंभीर तांत्रिक बिघाडामुळे वेळ लागल्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत वीजग्राहकांनी वीजपुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी किंवा अन्य सेवेसाठी महावितरणच्या कार्यालयात येऊ नये. किंबहुना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडूच नये. वीजपुरवठा खंडित झाला असल्यास किंवा अन्य महत्त्वाची तक्रार किंवा माहिती देण्यासाठी महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा़- ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन