शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-सेनेचे नेते विरोधात बोलत होते; पण निवडणुकीत त्यांनी दाखविली एकी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:07 IST

प्रणिती शिंदे याचे स्पष्टीकरण; उणिवा शोधण्याची वेळ नाही, विधानसभेलाही एकदिलाने काम करा

ठळक मुद्देनिवडणूक निकालानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांची भेट घेऊन संवाद साधलामनोहर सपाटे यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव का झाला यावर आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे सांगितले

सोलापूर : उणिवा, त्रुटी शोधत बसण्याची ही वेळ नाही. निवडणुकीअगोदर भाजप-सेनेचे नेते एकमेकांविरोधात बोलत होते. पण निवडणुकीत त्यांनी एकी दाखविली, त्याचा त्यांना फायदा झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले़ आता विधानसभेसाठीही लोकसभेसारखे एकदिलाने काम करायचे आहे, असेही आवाहन यावेळी केले.

निवडणूक निकालानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांची भेट घेऊन संवाद साधला. त्यावेळी प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निष्ठेने लोकसभेचे काम केल्याचे नमूद केले. त्यावर प्रवक्ते मनोहर सपाटे यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव का झाला यावर आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे सांगितले. निवडणूक प्रचार यंत्रणेत आपल्या काही उणिवा होत्या. 

भाजपने ज्या पद्धतीने मतदारसंघातील मतदारांचा प्रभाव पाहून प्रयोग केला. त्याप्रमाणे आपणही या गोष्टीकडे पाहणे गरजेचे आहे. भाजपचा उमेदवार लिंगायत समाजाचा आणि बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मागासवर्गीय समाजाकडे आपण लक्षच दिले नाही. तालुक्याच्या जबाबदाºया ज्यांच्यावर दिल्या, त्यांच्या कामाचा आढावा घेणे गरजेचे होते, असे मत मांडले. 

आमदार प्रणिती शिंदे यांनी आपण सर्वजण एकदिलाने काम केले. उणिवा, त्रुटी शोधत बसण्याची ही वेळ नाही. निवडणुकीअगोदर भाजप-सेनेचे नेते एकमेकांविरोधात बोलत होते. पण निवडणुकीत त्यांनी एकी दाखविली, त्याचा त्यांना फायदा झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अशाच पद्धतीने आपणही विधानसभेला एकीने काम करायचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी आभार मानताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आता कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. बैठकीला नगरसेवक चेतन नरोटे, प्रवीण निकाळजे, राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्षा सुनीता रोटे, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, रामचंद्र पवार, युवराज पवार आदी उपस्थित होते. 

शिंदे यांचा भ्रमणध्वनीवरून संपर्क- काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नगरसेवकांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून नाराज होऊ नका, लोकसभेसाठी सर्वांनी चांगले काम केले आहे. सूर्य दररोज वेगळी आशा घेऊन उगवतो. भविष्याचे किरण शोधण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागा, अशा सूचना दिल्या़त्यानंतर सोमवारी सकाळी आमदार प्रणिती शिंदे यांनी नगरसेवक व पदाधिकाºयांची काँग्रेस भवन येथे बैठक घेतली. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPraniti Shindeप्रणिती शिंदेSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस