दक्षिण सोलापूर काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीचे होटगी येथे आंदोलनम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:23 IST2021-03-27T04:23:47+5:302021-03-27T04:23:47+5:30

दक्षिण सोलापूर : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात तसेच इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या ...

South Solapur Congress Taluka Congress Committee's agitation at Hotgi | दक्षिण सोलापूर काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीचे होटगी येथे आंदोलनम

दक्षिण सोलापूर काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीचे होटगी येथे आंदोलनम

दक्षिण सोलापूर : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात तसेच इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी होटगी येथे आंदोलन करण्यात आले.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे आणि तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर हल्लाबोल करीत सुरेश हसापुरे यांनी टिकास्त्र सोडले. तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांनीही डिझेल पेट्रोल आणि गॅस सिलेंडरची वाढ करून सरकारने गरीबांना जगणं मुश्कील केल्याचा आरोप केला. यावेळी झेडपी सदस्य संजय गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती भीमाशंकर जमादार, पंडित सातपुते, सुभाष पाटोळे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

-------

२६ होटगी स्ट्राईक

दक्षिण सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने होटगी येथे धरणे आंदोलन करताना सुरेश हसापुरे , हरीश पाटील, भीमाशंकर जमादार, सुभाष पाटोळे, पंडित सातपुते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते

Web Title: South Solapur Congress Taluka Congress Committee's agitation at Hotgi