शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

... त्या बंद घरातून धुराचे लोट दिसताच मदतीला पोलिस आले धावून अन् पुढील अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 08:19 IST

सोलापूर न्युज नेटवर्क

मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील काझी गल्लीतील एका बंद घरात भर दुपारी अचानक धूर निघत असल्याची माहिती पोलिस प्रशासनास मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्याने गॅसचा  स्फोट होवून  होणारी दुर्घटना टळल्याने त्या गल्लीतील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

या घटनेची हकिकत अशी, मंगळवेढा शहरातील काझी गल्लीत भर दुपारी एक वाजता शबाना समीर मुलाणी या महिलेच्या बंद घराच्या दरवाजाच्या फटीतून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे पाहून गल्लीतील नागरिक भयभीत झाले होते. याची खबर स.पो.नि.बापूराव पिंगळे यांना मिळताच त्यांनी  पोलिस नाईक तुकाराम कोळी व खटकळे यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सदर ठिकाणी पोलिस कर्मचारी गेल्यानंतर बंद घरातून धुराचे लोट येत असल्याचे दिसले.घराच्या पाठीमागील  दरवाजातून पोलिसांनी घरात प्रवेश करून पाहिले असता चुलीजवळ ठेवलेले सरपण पेटल्याचे लक्षात आले. या जवळच सिलेंडर गॅस असल्याने काही अवधीमध्ये पोलिस आले नसते तर त्या गॅसचा स्फोट होवून दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली गेली.या पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील होणारी दुर्घटना टळल्याने गल्लीतील जमलेल्या लोकांचा जीव भांडयात पडला.सदर घराजवळ मोठया प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र घर बंद असल्यामुळे नेमके काय करावे हे त्यांच्या लक्षात येत नसल्याने घरातील धुराचे लोट वाढतच गेल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूरfireआग