पोलीस येताच त्यानं ऊसात ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:27 IST2021-09-12T04:27:19+5:302021-09-12T04:27:19+5:30
पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास क्षीरसागर, पोलीस नाईक आप्पासाहेब पवार, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण ...

पोलीस येताच त्यानं ऊसात ठोकली धूम
पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास क्षीरसागर, पोलीस नाईक आप्पासाहेब पवार, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, कॉन्स्टेबल संभाजी काशीद हे शनिवारी कटफळ हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यांना महूद ते चिकहूद रस्त्याने जात असताना बातमीदारामार्फत विठ्ठलवाडी येथील मारुती औदुंबर घाडगे हा शासकीय बंगल्यामागे जुन्या ओढ्यात चोरून हातभट्टी दारूची भट्टी चालवित असल्याची माहिती मिळाली होती.
त्याआधारे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी स्वतः धाड टाकून अवैधरीत्या नवसागर, युरिया, गुळापासून तयार केलेले ६०० लीटर गूळमिश्रित रसायन, नवसागर कांड्या, युरिया, दोन प्लास्टिक व एक लोखंडी बॅरल असे साहित्य जप्त केले. पोलिसांनी गूळमिश्रित रसायन जागेवर नष्ट करून मुद्देमाल ताब्यात घेतला. याबाबत पोलीस लक्ष्मण वाघमोडे यांच्या फिर्यादीनुसार मारुती घाडगे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
-----