अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी सोनकांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST2021-07-27T04:23:59+5:302021-07-27T04:23:59+5:30

अक्कलकोटचे सभापतीपद हे काँग्रेस पक्षाकडे असून सभापतीपद अनुसूचित प्रर्वगासाठी राखीव आहे. उर्वरित काळासाठी मुगळी गटाचे सदस्य ॲड. आनंदराव सोनकांबळे ...

Sonkamble as the Chairman of Akkalkot Panchayat Samiti | अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी सोनकांबळे

अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी सोनकांबळे

अक्कलकोटचे सभापतीपद हे काँग्रेस पक्षाकडे असून सभापतीपद अनुसूचित प्रर्वगासाठी राखीव आहे. उर्वरित काळासाठी मुगळी गटाचे सदस्य ॲड. आनंदराव सोनकांबळे यांना सभापतीपद मिळाले. सोमवारी २६ जुलै रोजी पंचायत समिती सभागृहात अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार अंजली मरोड, साहाय्यक अध्यासी अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी बी.डी. ऐवळे, कर्मचारी एस.बी. मठ, आर.के. जाधव, बी.आर. गुरव, जी.व्ही. हिरेमठ यांनी निवडीचे काम पाहिले.

या वेळी सदस्य सुरेखा काटगाव, प्रकाश हिप्परगी, अ. खय्युम पिरजाद, सुनंदा गायकवाड, गुंडप्पा पोमाजी, विलासराव गव्हाणे, सुरेखा गंदगे, अनिता ननवरे, भौरम्मा पुजारी, आनंदराव सोनकांबळे, राजेंद्र बंदिछोडे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी सभापती सुनंदा गायकवाड, प्रकाश हिप्परगी, मल्लिकार्जुन पाटील, मल्लिकार्जुन काटगाव, विलास गव्हाणे, अरुण जाधव, काशिनाथ गोळ्ळे, विश्वनाथ हडलगी, गुरू म्हेत्रे, महेश जानकर, मंगल पाटील, रामचंद्र गद्दी, दत्ता डोंगरे, सद्दाम शेरीकर, बाबासाहेब पाटील, मुबारक कोरबू, गोपीचंद लोंढे, शिवानंद पाटील, लक्ष्मण सोनकांबळे आदी उपस्थित होते.

----

फोटो : २६ अक्कलकोट

पंचायत समितीचे सभापती आनंदराव सोनकांबळे यांचा निवडीनंतर सत्कार करताना सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, प्रकाश हिप्परगी, सिद्धार्थ गायकवाड, सुरेखा काटगाव

Web Title: Sonkamble as the Chairman of Akkalkot Panchayat Samiti