शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

बेटा, मी आताच जेवलो तुम्ही झोपा..सकाळी बोलू म्हणणाºया पित्याचा घात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 12:25 IST

दोन मुलांचे छत्र हरपले; फोनच्या प्रतीक्षेतील मुलांना वडील गेल्याचा निरोप मिळाला

ठळक मुद्देकैलास परबळकर हे मूळचे उमरगा तालुक्यातील येणेगुर या गावचे रहिवासी आहेत राजू गुल्लापल्ली यांच्या सोलापुरातील सोलापूर-तुळजापूर रोडवर असलेल्या हॉटेल सौरभमध्ये मॅनेजर म्हणून कामाला होतेएक मुलगा पाकणी येथील वाईन शॉपमध्ये तर दुसरा मुलगा सागर हा सोलापूर शहरातील हॉटेलमध्ये काम करीत होता

संताजी शिंदे 

सोलापूर: हॉटेलमध्ये व्यवस्थापक असलेल्या पित्याला रात्रीचा डबा देऊन मुले घरी गेली, फोनवरून बोलताना मुलांना बेटा, मी आता जेवण केले आहे. तुम्ही झोपा.. सकाळी बोलू! असा निरोप दिलेल्या पित्याचा रात्रीतून घात झाला. दोन मुलांचे छत्र हरपल्याने परबळकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. 

कैलास आप्पानाथ परबळकर (वय ५०, रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) हे रात्री सोलापूर-तुळजापूर रोडवरील हॉटेल सौरभमध्ये होते. रात्रीच्या जेवणाचा डबा घेऊन मुलगा आकाश हॉटेलमध्ये आला होता. वडिलांबरोबर अर्धा तास गप्पा मारल्यानंतर साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा आपल्या घरी निघून गेला. शहरात पुन्हा संचारबंदी लागू होणार असल्याची माहिती समजल्यानंतर मुलगा आकाश याने वडील कैलास यांना फोन केला. फोनवर संचारबंदीबाबत बोलणे झाल्यानंतर कैलास परबळकर यांनी मुलांना बेटा तुमचं जेवण झालं आहे का? मी जेवण केले आहे, आता झोपतो.. तुम्हीही झोपा..

असे सांगून फोन ठेवला. मात्र रात्रीतूनच कैलास यांचा घात झाला. मुले आकाश व सागर हे वडिलांच्या फोनची वाट बघत होते, हॉटेल मालकाचा फोन आला आणि त्यांनी मुलांना बोलावून घेतले, तेव्हा वडील या जगात नसल्याचे समजले. 

मृतदेह पाहताच पत्नीने फोडला हंबरडा..कैलास परबळकर हे मूळचे उमरगा तालुक्यातील येणेगुर या गावचे रहिवासी आहेत. ते राजू गुल्लापल्ली यांच्या सोलापुरातील सोलापूर-तुळजापूर रोडवर असलेल्या हॉटेल सौरभमध्ये मॅनेजर म्हणून कामाला होते. त्यांची दोन्ही मुले गुल्लापल्ली यांच्याकडे कामाला होती. एक मुलगा पाकणी येथील वाईन शॉपमध्ये तर दुसरा मुलगा सागर हा सोलापूर शहरातील हॉटेलमध्ये काम करीत होता. ते सोलापुरात जरी राहत असले तरी त्यांचं अधूनमधून गावी येणेगुर येथे  जाणं-येणं होत होतं. सध्या पत्नी येणेगुर या गावी होती. कैलास यांचा खून झाल्याची माहिती मुलांनी आईला दिली नव्हती. सायंकाळी मृतदेह गावी येणेगुर येथे घेऊन जाताना मुलांनी आईला फोन करून सांगितले. कैलास यांचे प्रेत पाहताच पत्नीने हंबरडा फोडून रडण्यास सुरुवात केली. 

वडिलांचा असा घात होईल असे वाटले नव्हतेमी, माझे वडील आणि भाऊ आम्ही तिघे सोलापुरातच राजू गुल्लापल्ली यांच्याकडे कामाला होतो. आम्हा दोघा भावांचे लग्न झालेले असून, दोन-दोन मुली आहेत. वडील मॅनेजर म्हणून काम पाहत होते. मात्र ते हॉटेलमध्ये जेवण करत नव्हते, त्यांना घरचा डबा लागत होता. ते सरळ स्वभावाचे होते. त्यांचा असा घात होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी माहिती कैलास परबळकर यांचा मुलगा आकाश याने दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीMurderखून