शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आठशे रुपयांसाठी मुलाने केली पित्याला मारहाण

By दिपक दुपारगुडे | Updated: February 1, 2024 18:28 IST

यलमर मंगेवाडी येथील हणमंत येलपले यांनी ३० हजार रुपयांची मका विक्री केली होती.

सोलापूर: मका विक्री करून आलेल्या पैशांतून स्वतःकडे ८०० रुपये का ठेवून घेतले, या कारणावरून चिडलेल्या पोटच्या मुलाने जन्मदात्या पित्याला शिवीगाळ, दमदाटी करत काठीने जबर मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास यलमर मंगेवाडी (ता. सांगोला) येथे घडली. याबाबत हणमंत शिवाजी येलपले यांनी मुलगा गणेश येलपले याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

यलमर मंगेवाडी येथील हणमंत येलपले यांनी ३० हजार रुपयांची मका विक्री केली होती. दरम्यान, रात्री १० च्या सुमारास हणमंत येलपले हे जेवण करून घरी बसले होते. त्यावेळी मुलगा गणेशने वडिलांना मका विकलेले पैसे मागितले असता, त्यांनी त्याला ३० हजार रुपयांचा माल विकला असून, २९ हजार २०० रुपये त्याला देऊन स्वतःकडे ८०० रुपये ठेवून घेतले होते. त्यावेळी गणेशने त्यांना ‘तुला कशाला पैसे हवे आहेत, तू काय करणार आहे.  पैशांचे... बाकीचे पैसेसुद्धा मला दे’ असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेथेच पडलेल्या लाकडी दांडक्याने वडिलांच्या डोक्यात, तोंडावर, पाठीवर, हाता-पायावर मारहाण करून जखमी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी