शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात पेटला ‘मोदी अन् गांधी’ नावाचा वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 04:13 IST

कोनशिलेला काँग्रेसचा आक्षेप; झोपडपट्टीचे नाव भाजपाच्या नजरेत

- संतोष आचलारे सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची ठरलेली मोदी अन् गांधी ही नावं सोलापुरात मात्र वादग्रस्त बनली आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ३२ वर्षापूर्वी लावलेली कोनशिला मोदी नामक अधिकाऱ्यामुळे काँग्रेससाठी आक्षेपार्ह ठरली असतानाच गांधी नामक झोपडपट्टीही भाजपाच्या नजरेत आली आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले तथा जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरच कोनशिला आहे. पुणे विभागाचे तत्कालिन विभागीय आयुक्त चंद्रशेखर मोदी यांच्या हस्ते १ जुलै १९८७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाल्याची माहिती या कोनशिलेवर दिसून येत आहे. कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींची नावे नसल्याने ही कोनशिला झाकण्यात आली नाही, अशी भूमिका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली आहे, मात्र यात मोदी हे आडनाव असल्याने याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे सोलापूर शहरात असणाºया मोदी परिसरातील पोलीस चौकीवर असलेले मोदी नावही निवडणुकीच्या काळात चांगलेच चर्चेत आले आहे.बाजूला असलेल्या भाजप कार्यालयासमोरच राहुल गांधी नगर वसाहत आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या अनेक फलकांवर राहुल गांधी यांचे नाव झळकत आहे. त्यामुळे या नावाच्या फलकालाही भाजपने विरोध केला आहे. या परिसरात सामाजिक संस्था, शाळा व अन्य खासगी दुकानांसमोर सर्रास राहुल गांधी असे लिहिलेले दिसून येते.मोदींचा उल्लेख असणारे फलक हटवाजिल्हाधिकारी कार्यालयात, मोदी परिसरात व पेट्रोल पंप परिसरात मोदी यांच्या नावाने असलेले फलक अजूनही दिसून येत आहेत. हा आचारसंहितेचा भंग ठरणाराच विषय होणार आहे. त्यामुळे मोदी यांच्या नावाने असलेले फलक त्वरित काढण्यात यावेत, अशी मागणी असणार असल्याचे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी केली आहे.गांधी नावाच्या फलकाचे काय?भाजपा पक्ष कार्यालयासमोर राहुल गांधी यांचा उल्लेख असलेले फलक दिसून येतात. मग हे नाव असलेले फलक काँग्रेसला दिसत नाहीत का? केवळ मोदीद्वेषापोटी काँग्रेस असे राजकारण करीत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस