तापमानात घट झाल्याने सोलापूरकरांना भरू लागली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:53 AM2019-11-29T11:53:05+5:302019-11-29T11:54:52+5:30

हिवाळ्यातील आहाराचे नियोजन भरपूर पोषकतत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन करण्याची गरज

Solapurukar hoodoo hoodies due to temperature drop | तापमानात घट झाल्याने सोलापूरकरांना भरू लागली हुडहुडी

तापमानात घट झाल्याने सोलापूरकरांना भरू लागली हुडहुडी

Next
ठळक मुद्देलांबलेला पाऊस थांबल्यामुळे थंडीची सुरुवात देखील लांबलीनोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यामध्ये दरवर्षी तापमानाचा पारा घटत असतोसध्या थंडी वाढत असून मागील दहा दिवसांत पारा खाली येत आहे

सोलापूर : शहर व जिल्ह्यामध्ये आता थंडीचा जोर वाढू लागला आहे. वाढत्या थंडीमुळे सोलापूरकरांना फ हुडहुडी भासू लागली आहे. २८ नोव्हेंबरचे तापमान हे १९.१ अंश सेल्सिअस इतके असून, चार डिसेंबरपर्यंत १७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मागील वर्षी असणाºया थंडीचा विचार करता यंदाच्या वर्षी थंडी कमी असल्याचे दिसत आहे. या दोन वर्षांच्या तापमानाची तुलना केल्यास यंदाच्या वर्षी एक ते दोन अंश सेल्सिअसचा फरक आहे. १९ नोव्हेंबर रोजी तापमानाचा पारा १९.५ अंश सेल्सिअस इतका होता. हा पारा २७ नोव्हेंबर रोजी १७.५ अंश सेल्सिअसवर आला होता. मागील आठ दिवसात तापमान २ अंश सेल्सिअसने कमी झाल्याचे दिसत आहे. 

लांबलेला पाऊस थांबल्यामुळे थंडीची सुरुवात देखील लांबली. साधारणपणे नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यामध्ये दरवर्षी तापमानाचा पारा घटत असतो. यामुळे थंडीचे प्रमाणदेखील वाढते. या वर्षी लांबलेल्या पावसामुळे शहर व जिल्ह्याला ‘आॅक्टोबर हीट’चा अनुभव आला नाही. सध्या थंडी वाढत असून मागील दहा दिवसांत पारा खाली येत आहे. सकाळी हवेत गारवा असला तरी धुक्याचे प्रमाण खूप कमी आहे. मागील वर्षी धुके जास्त होते. थंडीची सुरुवात झाल्याने लोक परिसरातील बागेत व्यायाम करायला जात आहेत. हिवाळा हा व्यायाम करण्यासाठी सर्वात चांगला ऋतू समजला जातो. मात्र, बालक व ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने त्यांना ताप, सर्दी, खोकला आदी 

थंडीचा ऋतू हा आरोग्यासाठी चांगला मानला जातो. व्यायामासठी शक्यतो सकाळीच बाहेर पडणे गरजेचे असते. सकाळी प्रदूषणाचे प्रमाण कमी असते. सोलापुरात धुळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे स्कार्फ किंवा मास्क तोंडाला बांधावा. फुफ्फुसाचा आजार असणाºया रुग्णांनी नियमितपणे औषधे घ्यावीत. दम्याच्या रुग्णांनी त्यांना दिलेला पंपही वापरावा.
- डॉ. विशाल गोरे, एमडी मेडिसीन

थंडीतही रोज दीड ते दोन लिटर पाणी प्यावे
- हिवाळ्यात थंड तापमानामुळे सारखी तहान लागत नाही, म्हणून काही लोकांचे पाणी पिण्याचे प्रमाण खूप कमी होते. यामुळे याकडे लक्ष देत रोज दीड ते दोन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. हिवाळ्यात दिवस लहान असतो, त्यामुळे काहींचे वेळेचे व्यवस्थापन नीट होत नाही. थंडीत सकाळी लवकर उठावेसेही वाटत नाही. त्यामुळे व्यायामाचे नियोजन नीट होत नाही. व्यायाम करणे शरीराला आवश्यक आहे. आपण पौष्टिक पदार्थ खातो व पचनशक्तीही योग्य असते, तरीसुद्धा व्यायाम नसेल तर शरीराला या पोषकतत्त्वांचा योग्य वापर करता येणार नाही. त्यामुळे सर्वांनीच आपल्या हिवाळ्यातील आहाराचे नियोजन भरपूर पोषकतत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन करण्याची गरज आहे.

Web Title: Solapurukar hoodoo hoodies due to temperature drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.