शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’मध्ये सोलापूरची शून्याकडे वाटचाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:42 IST

जागतिक एड्स जनजागृती सप्ताह विशेष : नवीन रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट, ०़७२ टक्के प्रमाण

ठळक मुद्देशासनाच्या जनजागृती आणि मोफत औषधोपचार कार्यक्रमांमुळे नवीन रुग्णांच्या संख्येत प्रचंड घटसध्या नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण ०़७२ टक्के इतके आहेसोलापूरची वाटचाल गेटिंग टू झीरो अर्थात शून्याकडे सुरू आहे

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : २००८ साली सोलापुरात शंभर लोकांमागे १७ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळायचे़ म्हणजे पॉझिटिव्हचे प्रमाण सरासरी १७ ते १८ टक्के इतके होते़ शासनाच्या जनजागृती आणि मोफत औषधोपचार कार्यक्रमांमुळे नवीन रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे़ सध्या नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण ०़७२ टक्के इतके आहे़ सोलापूरची वाटचाल गेटिंग टू झीरो अर्थात शून्याकडे सुरू आहे, अशी माहिती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्राचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक भगवान भुसारी यांनी  ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

शासन सध्या गेटिंग टू झीरो अर्थात शून्य गाठायचंय हा उपक्रम राबवत आहे़ यात राज्याचे प्रमाण ०़५ टक्के इतके आहे़ राज्याची वाटचाल देखील शून्याकडे सुरू आहे़ चालू वर्षात सातशे नवीन एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत़ काही वर्षांपूर्वी हीच संख्या तीन ते चार हजारांवर होती़ एचआयव्हीमध्ये सोलापूर जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर आहे़ सध्या सोलापूर जिल्ह्यात सोळा हजार एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण आहेत़ यात साडेबारा हजार रुग्ण हे शासकीय रुग्णालयाकडून औषधोपचार घेताहेत, तर उर्वरित रुग्ण इतर खासगी रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत.

पूर्वी शासनाकडून एकाच वेळी महिनाभरासाठी गोळ्या दिल्या जायच्या़ आता तीन महिन्यांकरिता गोळ्या दिल्या जातात़ त्यामुळे रुग्णांना होणारा त्रास कमी झाला आहे़ बार्शी, पंढरपूर तसेच सोलापूर या ठिकाणी मोफत औषधोपचार केला जातो़ भगवान भुसारी यांनी सांगितले, जागतिक आरोग्य संघटनेकडून एचआयव्ही रोखण्यासाठी जोरदार जनजागृती मोहीम सुरू आहे़ संघटनेकडून प्रतिवर्षी एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी तब्बल १६३ हजार कोटी रुपये खर्च होतात़ यातील दोन हजार कोटी रुपये फक्त भारतावर खर्च केला जातात़ एचआयव्हीबाबत लोकांची मानसिकता बदलली असून, समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे़ यामुळे एचआयव्हीमुक्त सोलापूरकडे वाटचाल सुरू आहे़

मदर टू चाईल्डचे प्रमाणही घटले- एचआयव्ही पॉझिटिव्ह गरोदर मातेपासून बाळास एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता अधिक असते़ लागण होऊ नये, याकरिता मातेने विशेष काळजी घेतल्यास बाळ निगेटिव्ह जन्म घेऊ शकते़ पूर्वी मदर टू चाईल्डचे प्रमाण अकरा टक्के होते़ आता हे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा कमी झालेले आहे. सोलापुरात पूर्वी ३० ते ४० मुलं जन्मत: एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळायचे़ आता दोन ते चार बाळ हे पॉझिटिव्ह आढळतात़ मागील तीन वर्षांत सरासरी तीन टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्ह मुले जन्मली़ अपवाद या वर्षीचा आहे़ या वर्षी आठ मुले पॉझिटिव्ह जन्मली आहेत आणि राज्यात हेच प्रमाण सरासरी ५ टक्के इतके आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरHIV-AIDSएड्सHealthआरोग्यMedicalवैद्यकीय