शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

सोलापूरचा पारा ४२.२ अंशावर; मोसमातील सर्वाधिक तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:02 PM

गेल्या २८ वर्षांत सोलापूर शहराचे सर्वोच्च तापमान २००५ सालात २० मे रोजी ४५.१ अंश सेल्सिअस नोंदले आहे.

ठळक मुद्देएप्रिल,मे असे दोन महिने अद्याप उन्हाळा असल्यामुळे यंदा तापमानाचा २००५  सालातला उच्चांक मोडला जाऊ शकतो ?गेल्या सहा दिवसांपासून म्हणजे २३ तारखेपासून इथल्या हवामान खात्याकडे ४०.७, ४०८, ४०.७, ४१.२, ४१.२ आणि आज (गुरुवारी) या वर्षातील सर्वोच्च ४२.२ म्हणजे १ अंशाने तापमान वाढल्याची नोंद झाली आहे.

सोलापूर: मार्च महिना उजाडल्यापासून सातत्याने सोलापूरच्यातापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या सहा दिवसांपासून चाळिशी ओलांडत गुरुवारी चालू वर्षातले ४२.२ अंश सेल्सिअस तापमान येथील हवामान खात्याच्या प्रयोगशाळेत नोंदले गेले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सकाळी ९ वाजल्यापासूनच धगधगत्या उन्हाची तीव्रता सोलापूरकरांना जाणवू लागली आहे. यामुळे भोवळ येणे, डोके, कानशिलांचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या आकारांच्या टोप्यांचा वापर होऊ  लागला आहे.  प्रामुख्यानं नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने मंडळी बाहेर पडू लागली आहेत. दुपारच्या वेळी बहुतांश रस्त्यांवर तुरळक गर्दी जाणवू लागली आहे. 

गेल्या सहा दिवसांपासून म्हणजे २३ तारखेपासून इथल्या हवामान खात्याकडे ४०.७, ४०८, ४०.७, ४१.२, ४१.२ आणि आज (गुरुवारी) या वर्षातील सर्वोच्च ४२.२ म्हणजे १ अंशाने तापमान वाढल्याची नोंद झाली आहे. वाढत्या उन्हापासून बचावासाठी नागरिकांनी शुभ्र, तलम वस्त्रे वापरावीत. दुपारच्यावेळी बाहेर पडू नये. लहान मुले आणि वृद्धांची दक्षता घ्यावी. मधुमेही, दम्याच्या रुग्णांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी दिला आहे.

यंदा सर्वोच्च वाढ होईल?- गेल्या २८ वर्षांत सोलापूर शहराचे सर्वोच्च तापमान २००५ सालात २० मे रोजी ४५.१ अंश सेल्सिअस नोंदले आहे. यावर्षीची स्थिती पाहता यंदा त्यात वाढ होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. यंदा झालेले पर्जन्यमानही त्याला कारणीभूत असावे असे म्हटले जात आहे. एप्रिल,मे असे दोन महिने अद्याप उन्हाळा असल्यामुळे यंदा तापमानाचा २००५  सालातला उच्चांक मोडला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमान