शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

सोलापूरची गड्डा यात्रा ; द्वारकेची जड वाळू अन् तेल भरून सज्ज केले यात्रेतील पर्यायी नंदीध्वज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:21 IST

अनोखा प्रयोग : रेल्वे स्टेशनजवळील काडादी चाळ सराव मंडळच्या सेवेकºयांनी तयार केल्या काठ्या

ठळक मुद्देनंदीध्वजांच्या काठ्याची उंची साधारणत: ३० ते ३५ फूटकाठ्याचा वरील आणि खालील भाग पोकळ ठेवल्यामुळे काठीचे हेलकावे कमी होऊन नंदीध्वज पेलणे सुकरनंदीध्वज पेलण्यचा सराव करतानाच त्याच्या सक्षमतेची चाचणी

यशवंत सादूल 

सोलापूर : ग्रामदैवत सिध्दरामेश्वर यात्रेतील नंदीध्वजांबाबत काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास पर्यायी काठ्या मागवून त्यांना नंदीध्वजांचा साज चढविला जातो. या पर्यायी  काठ्याही मजबूत राहाव्यात, यासाठी काठ्यांच्या पोकळ जागेच्या ठिकाणी व्दारकेहून आणलेली खास वाळू आणि शेगा, करडीच्या तेलाचे मिश्रण ठासून भरण्यात आले आहे. काडादी चाळ सराव मंडळाने अनोख्या पध्दतीने तयार केलेल्या या मजबूत पर्यायी काठ्या सज्ज ठेवल्या आहेत.

मागील वर्षी लहान काठ्यांवर प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. म्हणूनच यंदा मिरवणुकीत वापरल्या जाणाºया मोठ्या काठ्यांवर हा वाळूचा प्रयोग केला आहे. त्या अधिक सक्षम असल्याचा मंडळाचा दावा आहे. रेल्वे स्टशेनसमोरील काडादी चाळ येथे मागील दोन दिवसांपासून भक्तगण या कार्यात मग्न आहेत. 

सिद्धरामेश्वरांच्या यात्रा मिरवणुकीत सर्व धार्मिक विधींचा साक्षीदार होत डौलाने सहभागी होणारे नंदीध्वज आबालवृद्धांच्या औत्सुक्याचा विषय असतो. या काठ्यांची जीवापाड जपणूक करून वर्षभर निगा राखण्यात येते. यात्राकाळातील मिरवणुक ीत काही अपरिहार्य कारणामुळे, हाताळताना काठीस क्षती पोहचल्यास त्याच क्षमतेचे नंदीध्वज ताबडतोब उपलब्ध करून द्यावे लागतात. नंदीध्वजास लागणारे बांबू उपलब्ध होण्यापासून तर यात्रेत समाविष्ठ होण्यापर्यंतची प्रक्रिया अवघड आहे.

नंदीध्वज पेलण्यचा सराव करतानाच त्याच्या सक्षमतेची चाचणी करण्यात येते. खोबरेहार, फुलांचे हार, तुडूप, हार्डी, पाटली, साज, जरीपटका, गुढी, कळस, खेळणे, भगवी पताका यांनी नंदीध्वज मिरवणुकीत सजविला जातो. सराव नंदीध्वज व मिरवणुकीतील नंदीध्वज यामध्ये ३० ते ४० किलोंचा फरक असतो. साज न चढविताचे वजन सुमारे ८० ते ९० किलो असते, तर साज चढविल्यावर हे वजन १२५ ते १३० किलोवर पोहोचते. त्यामुळे सराव करताना तेवढ्याच वजनाची साखळी बांधण्यात येते. सरावादरम्यान साखळी हेलकाव्याने खाली घसरते व हाताला टोचते. यावर पर्याय म्हणून सक्षम, चिवट व हेलकावे विरहित सरळ राहण्यासाठीद्वारका येथील वाळूचा प्रयोग करण्यात आला आहे.

काठीच्या प्रत्येक कप्प्याला छिद्र पाडून त्यात वाळू, करडी व शेंगा तेल भरण्यात आले. काठीला ईजा पोहचू नये म्हणून त्यास कॉर्कचे टोपण बसविण्यात आले. मागील दोन दिवसांपासून नागनाथ कळंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशैल वर्धा, श्रीकांत शेंडे, अशोक पाटील, सागर वाले, अरविंद गुडगुंटीकर, विलास कोकरे, मल्लिकार्जून वाले, नागराज तुप्पद, संकेत बाभुळगावकर, आकाश चनपुरे, श्रावण सांबळे भक्तगण कार्यरत आहेत.

द्वारकेची वाळूच का?- वस्तूत: वाळू सर्वत्र सारखीच असते; पण नंदीध्वजांसाठी वापरण्यात आलेल्या काठ्यांमध्ये व्दारकेचीच वाळू का वापरण्यात येते? असे कळंत्री यांना विचारले असता, ते म्हणाले की, आपल्याकडे मिळणारी वाळू आणि व्दारकेच्या वाळूमध्ये चिवटपणाचा मुलभूत फरक आहे. व्दारकेची वाळू मऊ आणि वजनदार असते. याशिवाय चिवटपणाही अधिक असते. विशेष म्हणजे तेलाबरोबर ती लवकर एकजीव होते.

परराज्यातून बांबू आणण्यातील अडचणीमुळे सध्या लोणंद व पाणशेत येथून काठ्या आणल्या आहेत. यात्रेसाठी नऊ पर्यायी नंदीध्वज तयार केले आहेत. ते पेलण्यास सुकर होण्यासोबतच टिकावू असण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. - नागनाथ कळंत्री, सराव मंडळ प्रमुख

हेलकावे कमी करण्यासाठी...- नंदीध्वजांच्या काठ्याची उंची साधारणत: ३० ते ३५ फूट असते. त्यातील खालील भागातील ४ फूट आणि वरील भागातील ४ फूट जागा पोकळ ठेऊन मधल्या जागेतील प्रत्येक कप्प्यात वाळू आणि तेलाचे मिश्रण भरण्यात येते. काठ्याचा वरील आणि खालील भाग पोकळ ठेवल्यामुळे काठीचे हेलकावे कमी होऊन नंदीध्वज पेलणे सुकर होते.

टॅग्स :Solapurसोलापूर