सोलापुरी शड्डू ; नंदीध्वज पेलण्याची ताकद देणारी सिद्धेश्वर तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 01:01 PM2018-11-20T13:01:34+5:302018-11-20T13:05:47+5:30

अनेक पिढ्यांची लाल मातीशी नाळ : पणजोबा ते पणतूपर्यंत सारेच येतात तालमीला

Solapuri Shaddu; Siddheshwar Taleem, who has the power to catch the flag | सोलापुरी शड्डू ; नंदीध्वज पेलण्याची ताकद देणारी सिद्धेश्वर तालीम

सोलापुरी शड्डू ; नंदीध्वज पेलण्याची ताकद देणारी सिद्धेश्वर तालीम

Next
ठळक मुद्देबाळीवेस मल्लिकार्जुन मंदिरालगत असलेल्या या तालमीची स्थापना १९१७ मध्येस्वातंत्र्य चळवळीतील गुप्त बैठका आणि खलबतींचे हे ठिकाणच झालेभक्तांना ताकद देणारे प्रेरणास्थान सिद्धेश्वर तालीम शतक पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण

यशवंत सादूल
सोलापूर : स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळीचे गुप्त ठिकाण असलेले व सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वज पेलणाºया भक्तांना ताकद देणारे प्रेरणास्थान सिद्धेश्वर तालीम शतक पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पणजोबांपासून पणतूपर्यंतच्या पिढ्यांनी येथे व्यायामाचा वारसा जपला आहे.

बाळीवेस मल्लिकार्जुन मंदिरालगत असलेल्या या तालमीची स्थापना १९१७ मध्ये हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, संगप्पा मुस्तारे व रेवणसिद्धप्पा हिरेहब्बू यांच्या पुढाकारातून झाली. पुढे स्वातंत्र्य चळवळीतील गुप्त बैठका आणि खलबतींचे हे ठिकाणच झाले. याची कल्पना तत्कालीन ब्रिटिश अधिकाºयांना आली. हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी मार्शल लॉ चळवळीत सहभागी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यावर मंगळवार पेठ पोलीस चौकी जाळण्याचा ठपका ठेवून अटक केली. त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र या तालमीने मल्ल घडविण्याचे कार्य पुन्हा सुरू केले.  

सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील नंदीध्वज पेलण्यासाठी लागणारी ताकद युवकांमध्ये निर्माण करण्यासोबत त्यांना प्रोत्साहन देत आजही सिद्धेश्वर तालीम आठ हजार चौरस फुटाच्या क्षेत्रफळात दिमाखात उभी आहे. फराळेश्वर महाराजांची समाधीही या परिसरात आहे.

सिद्धेश्वर तालमीमध्ये व्यायामासाठी १० वर्षांच्या मुलांपासून तर ६५ वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांचीच हजेरी असते. नंदीध्वज पेलण्याचा व्यायाम श्रावण महिन्यापासून सुरु होतो. तो यात्रा संपेपर्यंत चालतो. यात जोर, बैठक ा, हौदा आणि डंबेल्स या व्यायाम प्रकारावर जास्त भर दिला जातो. यातून नंदीध्वज पेलणाºया युवकांमधील पाय, कंबर आणि मनगटातील ताकद वाढते. शरीराच्या पुष्टतेसाठी खीर, बदाम, थंडाई या आहारासाठी प्रवृत्त केले जाते. पहाटे चार ते रात्री दहा वाजेपर्यंत वेगवेगळ्या बॅचेसमधून आबालवृद्ध व्यायामाला येतात. येथे आधुनिक जीम साहित्यही आहे. सामाजिक कार्यातही या तालमीचा सहभाग असतो.

अनेक पिढ्यांची लाल मातीशी नाळ
- स्वातंत्र्यपूर्व काळापासून या तालमीतील लाल मातीमध्ये अर्थात येथील हौदामध्ये पिढ्या रमत आहेत. व्यायामाचा हा वारसा एका पिढीकडून दुसºया पिढीकडे हस्तांतरित होत असताना त्याचे ऐतिहासिक महत्त्वही घराघरातून सांगितले जाते. त्यामुळेच या सिद्धेश्वर तालमीतील जुन्या सदस्यांचे नातू-पणतू येथे नित्यनेमाने येतात, कारण येथील लाल मातीशी त्यांची नाळ जुळलेली आहे.

सिद्धेश्वर तालमीचे संस्थापक सदस्य
- हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, रेवणसिद्धप्पा हिरेहब्बू, योगप्पा हब्बू, मुत्यप्पा मेंगाणे, बाबा दर्गो पाटील, मक्कण्णा भैरो पाटील, बाबुराव धुम्मा, भीमाशंकर थोबडे, संगप्पा मुस्तारे, बाबुराव सोन्ना (भोगडे) यांनी या तालमीची स्थापना केली. महेश, राजशेखर आणि शिवानंद हिरेहब्बू हे विद्यमान ट्रस्टी आहेत.

नंदीध्वज पेलण्याचा व्यायाम सोपा नसतो. एका नंदीध्वजाचे वजन १०० ते १५० किलो असते. उंची ३५ फूट असते. पहिल्या ‘नागफणा’ या नंदीध्वजाचे वजन तर २०० ते २५० किलो असते. एकट्यानेच वाहून न्यायचा असतो. त्यामुळे त्याचा सरावही तेवढाच कटाक्षाने या तालमीत आम्ही करवून घेतो.
- राजशेखर हिरेहब्बू
ट्रस्टी, सिद्धेश्वर तालीम

मातीमध्ये ताक !
च्येथील तालमीच्या हौदातील लाल मातीमध्ये दोन ते तीन महिन्यांतून एकदा शंभर ते सव्वाशे लिटर ताक मिसळले जाते. मल्लांचे शरीर थंड राहावे, माती मऊ राहावी आणि आयुर्वेदिक गुणधर्माचा फायदा मल्लांना व्हावा यासाठी ही काळजी घेतली जाते. 


या हिंद केसरींची भेट
च्विष्णू नागराळे, श्रीपती खंचनाळे, मारुती माने, विष्णू सावर्डे, सादिक पंजाबी, संभाजी पवार, हरिश्चंद्र बिराजदार, बसलिंग करजगी, बसलिंग ढेरजे या सर्व हिंद केसरींनी त्यांच्या हयातीत भेट दिली. 

Web Title: Solapuri Shaddu; Siddheshwar Taleem, who has the power to catch the flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.