शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
3
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
4
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
5
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
6
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
7
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
8
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
9
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
10
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
11
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
12
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
13
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
14
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
15
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
16
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
17
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
18
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
19
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
20
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याला ५०० कोटींची उलाढाल असलेल्या सोलापुरी केळीला आता बंगाली मजुरांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:11 IST

टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून माढा, करमाळा, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील सुमारे ५०० कोटींची उलाढाल असलेला केळी ...

टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून माढा, करमाळा, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील सुमारे ५०० कोटींची उलाढाल असलेला केळी निर्यात व्यवसाय पश्चिम बंगालमधून आलेल्या मजुरांवर अवलंबून आहे. या मजुरांची संख्या सुमारे ३ हजारांच्या आसपास आहे. ग्रीन बेल्टमधील शेतकरी आता उसाला पर्याय म्हणून केळी लागवडीकडे वळले आहेत. हमारे यहा बेरोजगारी है, इसलिए मजुरी के लिए महाराष्ट्र में आना पडता है अशा भावना मजुरांनी व्यक्त केल्या.

सात-आठ वर्षांपासून या भागातील शेतकरी केळी आखाती देशात निर्यात करीत आहे. निर्यातक्षम केळी फक्त उत्पादन करून चालत नाही तर त्यासाठी केळीच्या झाडावरून केळीचे घड कापून त्याची पॅकिंग करून कंटेनरमध्ये भरेपर्यंतची प्रक्रिया करण्यासाठी कुशल कामगारांची गरज असते. ही महत्त्वपूर्ण गरज पश्‍चिम बंगालमधून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या मजुरांनी पूर्ण केली आहे.

पश्चिम बंगालमधील कलकत्ता परिसरातील हे मजूर सध्या टेंभुर्णी, कंदर, करमाळा या ठिकाणी वास्तव्यास आहेत. डिसेंबर ते मे असे यांचे येथे वास्तव्य असते. मुकादमाकरवी ही यंत्रणा कार्यरत असते. एका ग्रुपमध्ये १८ ते ३० वयोगटातील १५ ते १८ तरून मजूर असतात. हे मजूर कामाच्या सोयीने छोट्या-छोट्या पत्र्याच्या खोल्या भाड्याने घेऊन वास्तव्य करतात. सकाळी ८ ते सायंकाळी ६ हे मजूर केळीच्या फडात असतात.

----

काय असते यांचे काम?

कापणी केलेले घड काळजीपूर्वक हाताळून घडाच्या फण्या वेगळ्या करणे, कागदी बॉक्समध्ये पॅकिंग करणे, बॉक्समधील प्लास्टिक पिशवीतील हवा काढणे ही सर्व कौशल्याची कामे बंगाली मजूर मन लावून करतात. त्यांना प्रतिटन १,५०० रुपये मजुरी मिळते. दिवसात सुमारे ८ टन केळी कापून पॅकिंग करतात. यासाठी त्यांना सरासरी ५०० ते ७०० मजुरी मिळते. एका मजुराकडे खर्च वजा जाता महिन्याला सुमारे १० हजार शिल्लक राहतात.

मेहनत का फल मिलता

हमारे पश्चिम बंगाल में कोई रोजगार ही नही है. हमारे यहा आम बहुत पैदा होता है मगर उसका निर्यात नही होती. कोई बडी बडी कंपनीयाभी नहीं है. मजुरी करने के लिए महाराष्ट्र में आना पडता है. यहाँ मेहनत का फल मिलता है, अशा शब्दात अबू ताबेल या मजुराने आपल्या भावना व्यक्त केल्या.

----

आपले मजूर अनेक कारणे सांगून अचानक काम? सोडून घरी राहतात. त्यामुळे नियोजन कोलमडते. आपल्या माणसांना कमी श्रमात जादा पैसे हवे असतात. परप्रांतीय मजूर प्रामाणिकपणे काम? करतात. आपल्या मजुरांनाही त्यांचा कष्ट करण्याचा गुण घेतला पाहिजे.

-किरण डोके, केळी निर्यातदार, कंदर.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारagricultureशेतीnorth eastईशान्य भारत