शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या अस्तित्वावरून सोलापूर जिल्हा परिषदेचे राजकारण तापलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:32 IST

मोहिते-पाटील गटाचा शह; व्हीपचा वाद सर्वोच्च न्यायालयात नेण्याची तयारी

ठळक मुद्दे झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलला म्हणून मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांवर कारवाई राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाºयांकडे दाखल केलेल्या तक्रारीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राजकारण आणखीन तापले

सोलापूर: झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलला म्हणून मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाºयांकडे दाखल केलेल्या तक्रारीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राजकारण आणखीन तापले आहे. मोहिते-पाटील गटाने झेडपीत राष्ट्रवादीचे अस्तित्व आहे काय याबाबत सवाल उपस्थित केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतप्त झाले आहेत. 

झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आदेश डावलल्याप्रकरणी मोहिते-पाटील गटाचे सदस्य शीतलदेवी मोहिते-पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले, अरुण तोडकर, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, गणेश पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर सुनावणी झाली. यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सहा सदस्यांविरुद्ध १३ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत दोन दोषारोप ठेवले. यामध्ये हे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले असून गटनेता बळीराम साठे यांनी काढलेल्या पक्षादेशाचा भंग केल्याचे स्पष्ट होत आहे.

तक्रारदार साठे यांनी पक्षादेश काढल्याचे ज्ञात असतानाही या सहा जणांनी ३१ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारास मतदान न करता विरोधी पक्षाच्या उमेदवारास मतदान केले आहे. त्यामुळे हे सहा सदस्य महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ चे कलम ३ चा भंग केल्याचे स्पष्ट होत असल्याचा दुसरा ठपका ठेवला. सदस्यांनी हे दोषारोप अमान्य करून याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात राष्ट्रवादी पक्ष झेडपीत कायदेशीररित्या अस्तित्वात नाही, त्यामुळे या सदस्यांना व्हीप बजावणे कायदेशीर नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीबाबतही आक्षेप घेण्यात आले. झेडपी निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीच्या गटाचे पार्टीत रुपांतर केले नाही असे निदर्शनाला आणले. त्या आधारावर या सदस्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. या निर्णयामुळे इकडे झेडपीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला आहे. 

या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी उच्च न्यायालयाच्या स्थगितीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असे म्हटले आहे. उच्च न्यायालयात सुनावणीवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कागदपत्रांची पूर्तता झाली नसावी. आम्ही तक्रारीसोबत सर्व पुरावे सादर केलेले आहेत असे ते म्हणाले. मोहिते-पाटील गटाने राष्ट्रवादीला शह दिल्याचे दिसून येत असल्याबाबत विचारले असता साठे म्हणाले आता पुढे बघा काय काय होणार आहे ते.

मी राष्ट्रवादीचाच कोण म्हणालेझेडपीत राष्ट्रवादीचे अस्तित्व नाकारणाºया त्या सदस्यांनी आपण कोणत्या चिन्हावरून निवडून आलो हे तरी सांगावे असे आव्हान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिले आहे. महिन्यापूर्वी मी राष्ट्रवादीचाच असे कोण म्हणाले होते. त्यावर मी दादा तुम्ही राष्ट्रवादीचे नाहीत असे उत्तर दिले होते. आता त्यांना ही वेळ का यावी असा सवाल त्यांनी केला. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिकावेराष्ट्रवादी पक्ष कायदेशीररित्या झेडपीमध्ये अस्तित्वात नाही. याचा अभ्यास करूनच आमच्या सदस्यांनी मतदान केले आहे. तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्हीप बजावले असे सांगणे हास्यास्पद आहे. कायदेशीर चौकटीत राहून आम्ही सर्व निर्णय घेतलेले आहेत.  निवडणूक कामकाजाबाबत त्यांना आणखी खूप शिक्षण घेण्याची गरज आहे.- धैर्यशील मोहिते-पाटील 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदPoliticsराजकारणVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस