शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ड्रेसकोड बंधनकारक अन्यथा पगार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 10:50 IST

राजेंद्र भारुड यांचा इशारा : १५ आॅक्टोबरनंतर होणार अंमलबजावणी

ठळक मुद्देड्रेसकोडला विरोध करणाºया शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांवरही शिस्तभंगाची कारवाईड्रेसकोडचा रंग ठरविण्याबाबत संघटनांच्या प्रतिनिधींना पत्रपरिपत्रक काढून अंमलबजावणीची तारीख घोषित केली जाणार

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना १५ आॅक्टोबरनंतर ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. जे शिक्षक ठरलेला ड्रेसकोड न घालता शाळेवर येतील त्यांना आॅक्टोबर महिन्यापासून पगार मिळणार नाही असा इशारा सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी  दिला. 

झेडपी शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय सभेने घेतला आहे. ड्रेसकोडला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. तरीही सभेत ठरल्याप्रमाणे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना ड्रेसचा रंग ठरविण्याबाबत पत्र दिले. पण संघटनांनी याला प्रतिसाद दिला नाही. जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे १६ संघटनांच्या अध्यक्षांनी ४ आॅक्टोबर रोजी झेडपीचे अध्यक्ष व सीईओंना निवेदन देऊन ड्रेसकोडची सक्ती करू नये म्हणून निवेदन दिले. यावर प्रतिक्रिया देताना सीईओ भारुड यांनी हा सभेने घेतलेला निर्णय आहे, तो सर्वांना मान्य करावाच लागेल.

प्रशासन म्हणून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची माझी जबाबदारी आहे. ड्रेसकोडमुळे शाळांना शिस्त येते. अनेक खासगी शाळांमध्ये ड्रेसकोडची अंमलबजावणी केली जाते. ड्रेसकोडला कोणत्याही शिक्षकांचा विरोध नाही. सर्व कर्मचारी, अधिकारी ड्रेसकोडमध्ये असतात. त्यामुळे हा निर्णय सर्वांना मानावाच लागेल असे डॉ. भारुड यांनी स्पष्ट केले. 

ड्रेसकोडचा रंग ठरविण्याबाबत संघटनांच्या प्रतिनिधींना पत्र दिले होते. पण त्यांनी प्रतिसाद न दिल्याने आता हा निर्णय शिक्षण समितीवर सोपविला आहे. शुक्रवारी स्थायी समितीची बैठक आहे किंवा शिक्षण समितीने बैठक घेऊन १0 आॅक्टोबरपर्यंत निर्णय द्यावा. अन्यथा यापूर्वी जो ड्रेसकोड ठरविला होता त्याची अंमलबजावणी केली जाईल. गणवेश शिक्षकांनी स्वत: खरेदी करावयाचा आहे व यासाठी ७ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. याबाबत परिपत्रक काढून अंमलबजावणीची तारीख घोषित केली जाणार आहे. या तारखेनंतर जे शिक्षक गणवेशाविना येतील त्यांचा पगार काढला जाणार नाही. गणवेशात हजर राहणाºया शिक्षकांबाबत मुख्याध्यापकांकडून अहवाल घेतला जाणार आहे. 

अन्यथा पदाधिकाºयांवर कारवाई

आता यापुढे ड्रेसकोडला विरोध करणाºया शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांवरही शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा डॉ. भारुड यांनी दिला आहे. शिक्षक संघटनेचे पदाधिकारी नोकरी करतात. गणवेश हा शाळेच्या शिस्तीचा भाग आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास विरोध करणे म्हणजे शिस्तभंग करण्यासारखे आहे. 

झेडपी अध्यक्ष म्हणाले चर्चा करूच्झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांना ड्रेसकोडला विरोध असल्याबाबत विचारले असता, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करू असे सांगितले. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी निधी उपलब्ध नसल्याबाबत सांगितले आहे, या प्रश्नाला उत्तर देताना सुभाष माने यांनी गणवेश शिक्षकांनी घ्यायचा आहे. त्यामुळे झेडपीच्या निधीची आवश्यकता काय असे म्हटले आहे. मी स्वत: ३५ वर्षे गणवेशात काढली आहेत. शाळांमध्ये शिस्त महत्त्वाची आहे. खासगी शाळांमधील शिक्षकांना दहा हजार पगार असतो पण ते गणवेशातच येतात. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSchoolशाळा