शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड  ३१ डिसेंबरला होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:10 IST

शासनाने पाठविले परिपत्रक : पंचायत समिती सभापती निवडही त्याचवेळी

ठळक मुद्देग्रामविकास विभागाने अचानक गुरूवारी परिपत्रक काढून झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम पुढे ढकललाआता दहा दिवसाची नोटीस गृहित धरल्यास वर्षाअखेर म्हणजे ३१ डिसेंबरला मुहूर्त लागू शकतोआता २0 डिसेंबरला अध्यक्ष व सभापतींचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन निवड होईपर्यंत हंगामी म्हणून तेच पदाधिकारी कारभारी म्हणून राहणार ?

सोलापूर : झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापती पदाची २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेली निवडणूक स्थगित करण्यात आली आहे अशी माहिती उप जिल्हाधिकारी (महसूल) गजानन गुरव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. सायंकाळी दिली. 

विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी २१ डिसेंबर रोजी झेडपी अध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापतीची निवड होणार असल्याचे जाहीर केले होते.  त्यावर झेडपीचे सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी या निवडीसाठी २१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विशेष सभा बोलावण्यात आल्याची नोटीस जारी केली आहे. झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याची मुदत सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. 

पीठासन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संदीप जाधव यांच्या उपस्थितीत सभा सुरू झाल्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना माघार घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर लगेच निवडणुकीचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यावर राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. झेडपीचे अध्यक्षपद एससी सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे.

यानुसार पाच पुरुष व पाच महिला सदस्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. त्यात महाविकास आघाडी व समविचारी आघाडीतर्फे कोणाचे नाव येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीतील पदाधिकाºयांची सोमवारी बैठक बोलावली आहे तर भाजपच्या गोटात समविचारीची जुळणी करण्याच्या गुप्त हालचाली सुरू आहेत. 

झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अशा हालचाली सुरू असतानाच गुरुवारी शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास आलेल्या संदेशावरून निवडणूक कार्यक्रमाबाबत तातडीने अहवाल मागविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुका आणि अतिवृष्टीमुळे शासनाने २३ आॅगस्ट रोजी एका अद्यादेशाद्वारे झेडपी अध्यक्ष व पंचायत समिती सभापतीपदांना १२० दिवसांची मुदतवाढ दिली. २० डिसेंबर रोजी ही मुदत संपत असल्याने २१ डिसेंबर रोजी निवडणुका घेण्याचे निश्चित करून जिल्हाधिकाºयांनी निवडीचा हा कार्यक्रम घोषित केला होता.  पण झेडपी अध्यक्षाच्या निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलाव्यात, अशी मागणी काही आमदारांनी केल्याने शासनाने याबाबत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती घेतली. 

शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून सायंकाळी या निवडणुकीबाबत परिपत्रक आल्याचे उप जिल्हाधिकारी गजानान गुरव यांनी सांगितले. या पत्रानुसार ग्रामविकास विभागाने १0 डिसेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार निवडीचा कार्यक्रम घेण्याचे सूचित केले आहे. २0 डिसेंबर रोजी अध्यक्ष व सभापतीची मुदत संपल्यानंतर २१ डिसेंबर रोजी निवडीसाठी दहा दिवसाची नोटीस जारी केली जाईल. त्यानंतर ही निवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे २१ डिसेंबरची तारीख आता स्थगित झाली आहे. 

२१ डिसेंबरची तारीख स्थगितग्रामविकास विभागाने अचानक गुरूवारी परिपत्रक काढून झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. आता दहा दिवसाची नोटीस गृहित धरल्यास वर्षाअखेर म्हणजे ३१ डिसेंबरला मुहूर्त लागू शकतो, अशी माहिती देण्यात येत आहे. पण आता २0 डिसेंबरला अध्यक्ष व सभापतींचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन निवड होईपर्यंत हंगामी म्हणून तेच पदाधिकारी कारभारी म्हणून राहणार का हे अजून स्पष्ट झाले नाही. २१ डिसेंबरला निवडणूक म्हणून गुरूवारची झेडपीची स्थायी सभा झाली नाही हे विशेष.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय