शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँकेकडे पैसे नसल्याने खरिपाचे कर्ज वाटप ४० कोटींनी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 13:39 IST

दुष्काळ व कर्जमाफीचा परिणाम; माफीच्या अपेक्षेने शेतकºयांनी रक्कमच भरली नाही

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला खरीप हंगामासाठी ३०३ कोटी ९२ लाख ९७ हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्टसोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा अशी ओळख असली तरी  मागील काही वर्षांत खरीप पेरणीचे क्षेत्रही वाढलेसंपूर्ण कर्जमाफी होईल या अपेक्षेने आजही शेतकरी बँकांचे कर्ज भरण्यास तयार नाहीत

सोलापूर: संपूर्ण कर्जमाफी होईल या अपेक्षेने आजही शेतकरी बँकांचे कर्ज भरण्यास तयार नाहीत त्यातच पाऊस नसल्याचाही परिणाम झाला असून, खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप मागील वर्षीच्या तुलनेत ४० कोटीने कमी झाले आहे. जिल्हा बँकेकडे पैसे नसल्याचीही प्रमुख अडचण आहेच.

सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा अशी ओळख असली तरी  मागील काही वर्षांत खरीप पेरणीचे क्षेत्रही वाढले आहेच. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला खरीप हंगामासाठी ३०३ कोटी ९२ लाख ९७ हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट  आहे. 

या हंगामात सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकाशिवाय उसाची लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जाते व जिल्हा बँक ऊस लागवडीसाठी एकूण कर्जाच्या ६५ टक्के कर्ज उसासाठी देते. मागील दोन-तीन वर्षांत राज्यातील काही जिल्ह्यात सलग दुष्काळी परिस्थिती असल्याने संपूर्ण कर्जमाफीची मागणी होत होती. राज्य शासनाने दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले असून आजही संपूर्ण कर्जमाफी होईल या अपेक्षेने शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत. याशिवाय जुने कर्ज भरले तर नव्याने कर्ज बँका देतात; मात्र पाऊस नसल्याने शेतात पीकच नसल्याने बँका कर्ज देतीलच असे नाही. यामुळे शेतकरी कोणतेही कर्ज भरण्यास तयार नाहीत. 

मागील वर्षी खरीप हंगामासाठी आतापर्यंत १६८ कोटी ९६ लाख ७९ हजार रुपये पीक कर्ज वाटप झाले होते. यावर्षी त्यात ४० कोटीने घट झाली आहे. 

यावर्षी आतापर्यंत १२८ कोटी ८५ लाख ९४ हजार रुपये पीक कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यात पाऊस म्हणावा तसा किंवा खरीप पिकांसाठी पोषक तेवढा पडला नसल्याने शेतकरी पीककर्ज मागणीसाठी बँकांकडे येत नाहीत. जिल्हा बँकेकडे कर्ज देण्यासाठी पैसेच नसल्याने जे शेतकरी पूर्वीच्या कर्जाचा भरणा करतील व भरणा केलेलीच रक्कम त्या शेतकºयाला नव्याने कर्ज म्हणून दिली जात आहे. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी कर्ज वाटप कमी झाले असल्याचे सांगण्यात आले.

तर कर्ज वाटपाचा आकडा वाढेल..सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात उसाची लागवड केली जाते व जिल्हा बँकही ऊस लागवडीवर कर्ज देते. जुने कर्ज शेतकरी भरतात व नव्याने कर्जही बँक देते. यापुढील नक्षत्रात चांगला पाऊस पडला,उजनी धरण, तलाव भरले तर उसाच्या लागवडीला वेग येईल व कर्ज वाटपाचा आकडाही वाढेल असे सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रgovernment schemeसरकारी योजनाagricultureशेती