सोलापूर: दुभाजकाला धडकून तरुणाचा मृत्यू, मध्यरात्री अपघात

By रूपेश हेळवे | Updated: June 1, 2023 13:25 IST2023-06-01T13:24:36+5:302023-06-01T13:25:16+5:30

गुरूवारी पहाटे हा अपघात झाला.

Solapur: Youth dies after hitting a divider, midnight accident | सोलापूर: दुभाजकाला धडकून तरुणाचा मृत्यू, मध्यरात्री अपघात

सोलापूर: दुभाजकाला धडकून तरुणाचा मृत्यू, मध्यरात्री अपघात

सोलापूर : मध्यरात्रीच्या सुमारास होटगी रोडवरील भगवान महावीर चौकातील रस्त्याच्या दुभाजकला धडकून एका २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. सुरज पवार ( वय २१, रा. पूनम नगर, जुळे सोलापूर) असे त्या तरूणाचे नाव आहे. गुरूवारी पहाटे हा अपघात झाला.

गुरूवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास मृत सुरज हा दुचाकीवरून जात असताना भगवान महावीर चौकातील दुभाजकाला धडकला. यात त्याच्या डोक्याला, तोंडाला गंभीर मार लागून तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी लगेच उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

Web Title: Solapur: Youth dies after hitting a divider, midnight accident