शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उसने घेतलेल्या १ हजार रुपयांसाठी चापट मारली; शुद्ध हरपलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 20:05 IST

सोलापुरात १ हजार रुपयांसाठी झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Solapur Crime: सावकाराकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून नई जिंदगीत मंगळवारी एकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरात एक हजार रूपयासाठी चापट मारल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

बुधवारी उसने दिलेल्या एक हजार रुपयाची मागणी करून झालेल्या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार दुपारी सव्वाचारच्या सुमारास गुरुदत्त नगरात घडला. दशरथ अर्जुन धोत्रे असे मृत तरुणाचे नाव आहे. शवविच्छेदनासाठी तरुणाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

दशरथ हा टेम्पो चालक होता. बुधवारी सुट्टी असल्याने ते घरीच होता. दशरथ हा घराजवळील ड्रेनेजच्या मोठ्या पाइपवर बसला होता. यावेळी पैशाच्या कारणावरून गोविंद बिराजदार याने त्याला चापट मारली. दशरथने  १ हजार रुपये उसने घेतले होते. गुरुदत्त नगरात दोघे एकत्र असताना गोविंदने दशरथला त्याने दिलेले पैसे मागितले. यावेळी वाद होऊन गोविंदने दशरथला चापट मारली. यातच त्याची शुद्ध हरपली आणि तो खाली पडला. दशरथचा भाऊ युवराज याने तात्काळ त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दशरथ मृत पावल्याचे डॉक्टरांनी तपासणी करुन सांगितले. दशरथच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. 

दरम्यान या घटनेनंतर शवविच्छेदनानंतर दशरथच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे आल्यावर संबंधितावर गुन्हा नोंदवून पुढील कारवाई करण्यात असे पोलिस निरीक्षक दादा गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस