शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
4
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
5
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
6
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
7
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
8
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
9
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
10
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
11
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
12
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
13
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
14
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
15
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
16
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
17
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
18
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
19
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
20
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले

सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिका व सिव्हिल हॉस्पिटलवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणार, पहिला टप्पा ८४५ किलो व्हॅटचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 11:23 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पातून मनपा व सिव्हिल हॉस्पिटलमधील इमारतीवर पहिल्या टप्प्यात ८४५ किलो व्हॅट क्षमतेचा सौरऊर्जेचा प्रकल्प साकारण्याच्या कामाला लवकर सुरुवात होणार आहे. 

ठळक मुद्देया प्रकल्पातून सोलापुरात तीन टप्प्यात दोन मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणारस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने सोलापुरात हा प्रकल्प राबविण्यासाठी केंद्रस्तरावर टेंडर मागविण्यात आले आठवडाभरात मनपाच्या इमारतीवर सौरऊर्जा निर्माण करणारे संच बसविण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : स्मार्ट सिटी प्रकल्पातून मनपा व सिव्हिल हॉस्पिटलमधील इमारतीवर पहिल्या टप्प्यात ८४५ किलो व्हॅट क्षमतेचा सौरऊर्जेचा प्रकल्प साकारण्याच्या कामाला लवकर सुरुवात होणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातून सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातून सोलापुरात तीन टप्प्यात दोन मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. सध्या बाजारात १ किलो व्हॅट वीज निर्मितीचे सोलर संच ६२000 उपलब्ध आहेत. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने सोलापुरात हा प्रकल्प राबविण्यासाठी केंद्रस्तरावर टेंडर मागविण्यात आले होते. यात राष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक दरातून सोलर एनर्जी  कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीने सर्वात कमी बजेटमध्ये म्हणजे ३५000 दर दिला आहे. या कंपनीने पहिला टप्पा उभारण्याचे काम पुण्याच्या व्होल्टेज इंप्रा या कंपनीला काम दिले आहे. आठवडाभरात मनपाच्या इमारतीवर सौरऊर्जा निर्माण करणारे संच बसविण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात हुतात्मा स्मृती मंदिर, कौन्सिल हॉल, प्रशासकीय इमारतीवर प्रत्येकी ५0 किलो व्हॅटचे संच बसविले जाणार आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार तथा सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्व इमारतींवर ६९५ किलो वॅटचे संच बसविण्यात येणार आहेत. यासंबंधी मनपा, रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि करारदार कंपनीबरोबर करार करण्यात येत आहे. या करारानुसार सिव्हिल हॉस्पिटलच्या विजेच्या बिलातून उरलेली रक्कम मनपाला मिळणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात सौरऊर्जेसाठी ८ कोटी निधीची तरतूद आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे तीन कोटी खर्च होतील असा अंदाज आहे. --------------------दुसरा टप्पा पंप हाऊस....- शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मनपाचे १६ पंपिंग हाऊस आहेत. त्यापैकी तीन पंपिंग हाऊसचे काम सध्या अमृत योजनेतून करून घेण्यात येत आहे. दुसºया टप्प्यात उरलेल्या १३ पंपिंग हाऊसवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव आहे. पंपिंग हाऊसचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याचा अहवाल सादर झाल्यावर प्रत्यक्षात प्रकल्प साकारण्याच्या हालचाली होतील. तिसºया टप्प्यात इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याबाबत विविध परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे.  स्मार्टरोडचे कामही प्रगतिपथावर आहे. गड्डायात्रेसाठी पादचाºयांसाठी खुला केलेला हा रस्ता ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पुढील कामाकरिता बंद करण्यात आला असल्याचे सहायक अभियंता तपन डंके यांनी सांगितले.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका