शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठाच्या 'विशेष सुरक्षित मास्क'चे पेटेंट भारत सरकारच्या पेटेंट नियतकालिकेत प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 10:10 IST

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची माहिती

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्राध्यापक व  संशोधक  विद्यार्थ्यांनी कोरानापासून संरक्षणासाठी विशेष मास्कची निर्मिती केली असून त्याचे पेटेंट भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाच्या नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. विद्यापीठाच्या वैभवात भर घालणारी ही बाब असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी म्हटले आहे.

कोरोना महामारीपासून संरक्षणासाठी विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलातील फंक्शल मटेरियल्स लॅबरोटरी व इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून  भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. विकास पाटील व त्यांच्या सहकारी संशोधकांनी अँटीमायक्रोबायोल नॅनो पार्टिकल संशोधन प्रयोगशाळेत तयार करून त्याचा मास्ककरिता उपयोग केलेला आहे. त्यापासून 'अँटीमायक्रोबायोल नॅनो पार्टिकल बेस्ड फेस मास्क'ची निर्मिती करण्यात आली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर 1000 या विशेष सुरक्षित मास्कची निर्मिती करण्यात आलेली आहे व सदरील मास्क डॉक्टर्स, रूग्णालये, सामाजिक संस्था यांना वितरित करण्यात आले. त्याच बरोबर ते आयसीएमआर, नवी दिल्ली आणि एनआयव्ही, पुणे, मुंबई यांनाही पाठविण्यात आले. याचबरोबर त्याच्या पेटंटसाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालय, मुंबई येथे दाखल करण्यात आले. त्यासंदर्भात पेटंट कार्यालयाकडून या 'स्पेशल मास्क'चे पेटेंट नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितिन गडकरी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनाही मास्क भेट म्हणून देण्यात आले होते, त्यांनीही चांगला अनुभव सांगितलेला आहे. या मास्कच्या निर्मितीसाठी भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील योगेश जाधव, युवराज नवले तसेच इनक्युबेशन सेंटरमधील प्रियांका चिप्पा यांचेही सहकार्य मिळाले आहे. 

अँटीमायक्रोबायोल नॅनो मास्कनॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या मास्कला दोन लेयर असून याचा वापर केल्यास कोरोना विषाणूपासून पूर्णतः सुरक्षित राहता येते. नॅनोपार्टिकलचे साइज 20 ते 30 नॅनोमीटर आहे. अनेक वेळा धुऊन मास्क वापरता येतो. मटेरियल कॉटन फॅब्रिक्सचे असल्याने श्वास घ्यायला अडचण होत नाही व जिना चढताना धाप लागत नाही, असा संशोधनाचा निष्कर्ष निघाला आहे व वापरकर्त्यांनीही अनुभव सांगितलेले आहे. अल्पदर ना नफा ना तोटा या तत्त्वावर निर्मिती झालेली आहे. आकर्षक रंगसंगतीचा वापर केलेला आहे. इको फ्रेंडली व ग्रीन केमिस्ट्रीचा वापर करून तयार करण्यात आलेला मास्क सर्वांना आवडणारा ठरला आहे. मास्कच्या अधिक माहितीसाठी योगेश जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि प्रा. डॉ. विकास पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य